Fashion: Men, want the perfect look? | Fashion : ​पुरुषांनो, परफेक्ट लूक हवाय ?

आपली पर्सनॅलिटी आपल्या लूकवर अवलंबून असते आणि त्यानुसारच समोरचा व्यक्ती त्याच्या मनात आपली इमेज तयार करतो. यासाठी आपणास प्रत्येकवेळी ‘रेडी फॉर रिव्यु’ राहावे लागेल. म्हणून पुरुषांसाठी आम्ही खास फॅशन टिप्स देत असून ज्या आपणास आकर्षक लूक तर देतीलच शिवाय आपली इमेजदेखील अपग्रेड करतील.  

* फॅशनला अपटेड करणे म्हणजे आपण एका रॉकस्टारसारखे दिसावे असे मुळीच नाही. चांगली इमेज बिल्ड करण्यासाठी आपण सिंपल दिसा. यासाठी सर्वप्रथम आपण अशी वार्डरॉब तयार करावी लागेल, ज्यात आपणास कंफर्ट फिल करणारे कपडे असतील. यासाठी आपण सिंपल कपड्यांची निवड करु शकता. 

* विशेषत: आपणास कपडे खरेदी करण्याची आवड निर्माण करावी लागेल. शिवाय कपड्यांबाबतचे नॉलेज वाढवावे लागेल. यासाठी जेव्हाही शॉपिंगसाठी जाणार त्या अगोदर आपणास नेमके कोणते आणि कसे कपडे खरेदी करायचे आहेत याबाबत थोडे नियोजन करावे लागेल. असे केल्यास आपणास कपड्यांची निवड करताना कंफ्युजन होणार नाही.  
 
*  बऱ्याचदा आपण असे कपडे खरेदी करतो की ते आपणास चांगले तर वाटतात मात्र बरेच लोक त्यात कमी दाखवितात. यासाठी कधीही शॉपिंग करताना एकटे जाऊ नका. यामुळे कपड्यांची योग्य निवड होईल शिवाय योग्य फिटिंगचेही कपडे मिळतील.  

* जर आपणास जीन्स आवडत असेल तर आपण फिटिंगकडे विशेष लक्ष द्यायला हवे. शिवाय शर्ट इन करत असाल तर पॅन्टवर स्ट्रेच येऊ नयेत आणि खांद्यावर शर्ट योग्य पद्धतीने फिट असावा. यामुळे आपला लूक नक्कीच परफेक्ट दिसण्यास मदत होईल. 
 
Also Read : ​Beauty : ​प्रसंगानुसार अशी असावी पुरुषांची परफेक्ट हेअरस्टाइल !
Web Title: Fashion: Men, want the perfect look?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.