केसांचं सौंदर्य राखण्यासाठी 'या' व्हिटॅमिन्सचा आहारात करा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:26 PM2018-12-11T18:26:55+5:302018-12-11T18:28:12+5:30

आपल्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी केसांची मोठी भूमिका असते. आपले केस सुंदर, दाट आणि मुलायम असावेत अशी सर्वांचीच इच्छा असते. केस सुंदर आणि मजबूत असतील तर केसांचं आरोग्य उत्तम आहे असं समजलं जातं.

Essential vitamins for healthy hairs | केसांचं सौंदर्य राखण्यासाठी 'या' व्हिटॅमिन्सचा आहारात करा समावेश

केसांचं सौंदर्य राखण्यासाठी 'या' व्हिटॅमिन्सचा आहारात करा समावेश

Next

आपल्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी केसांची मोठी भूमिका असते. आपले केस सुंदर, दाट आणि मुलायम असावेत अशी सर्वांचीच इच्छा असते. केस सुंदर आणि मजबूत असतील तर केसांचं आरोग्य उत्तम आहे असं समजलं जातं. केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्या डाएटमध्ये काही व्हिटॅमिन्सचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. हे व्हिटॅमिन्स केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासोबतच त्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठीही मदत करतात. जाणून घेऊया कोणत्या व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश करावा आणि त्या व्हिटॅमिन्समुळे आरोग्याला होणारे फायदे...

1. व्हिटॅमिन ए :

व्हिटॅमिन ए केस वाढवण्यासाठी, दाट आणि मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेचा प्रभाव सर्वात आधी केसांवरच होतो. केसांचं सौंदर्य नष्ट होऊन ते रूक्ष दिसू लागतात. केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी शरीरामधील व्हिटॅमिन ए च्या 1000 ते 4000 यूनिटची गरज असते. 

2. बी कॉम्प्लेक्स :

शरीरामध्ये बी कॉम्प्लेक्सची कमतरता असेल तर ऐन तारूण्यात केस पांढरे होणं आणि कमजोर होऊन गळण्यासारख्या समस्या उद्भवतात. बी कॉम्पेक्समध्ये आढळून येणारं पँटोथॅनिक अॅसिड पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं. पॅरा अमिनो बँजाइक अॅसिड आणि फोलिक अॅसिड केस काळे करण्यासाठी मदत करतात. 

3.  व्हिटॅमिन सी :

शरीरामध्ये व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे केस रूक्ष होतात आणि डोक्याची त्वचा कोरडी होते. ज्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात आणि केस गळण्यास सुरुवात होते. 

4. व्हिटॅमिन डी :

शरीरामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी असेल तर केस वाढण्यासाठी, दाट होण्यासाठी तसेच केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते. 

5. व्हिटॅमिन ई :

व्हिटॅमिन ई शरीरामध्ये अँड्रोजन नावाचं हार्मोन उत्प्रेरित करतं. जे केस सुंदर, दाट. मुलायम आणि चमकदार होण्यासाठी मदत करतं. 

Web Title: Essential vitamins for healthy hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.