Easy steps to apply henna will not show a single grey hair | केसांना मेहंदी लावण्याच्या सोप्या स्टेप्स; पांढरे केस होतील दूर 
केसांना मेहंदी लावण्याच्या सोप्या स्टेप्स; पांढरे केस होतील दूर 

(Image Credit : FirstCry Parenting)

केसांना कलर करण्यासाठी अधिकाधिक लोक मेहंदीचा वापर करतात. पांढऱ्या केसांना कलर करण्यासाठी जर तुम्हाला केमिकल असणाऱ्या डायचा वापर करायचा नसेल तर मेहंदीचा वापर करणं फायदेशीर ठरतं. केसांना कलर करण्यासाठी मेहंदीचा वापर केल्याने पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यासोबतच केस दाट होण्यासही मदत होते. त्यामुळे केसांना योग्य पद्धतीने मेहंदी लावून कलर करणं सहज शक्य आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून मेहंदी लावणं शक्य होतं. 

मेहंदी लावण्यासाठी सोप्य स्टेप्स :

चहा पावडर उकळून घ्या :

मेहंदी लावण्याआधी त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तयार करण्यासाठी चहा पावडर पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर तेच पाणी मेहंदीची पेस्ट तयार करण्यासाठी वापरा. 

मेहंदी पेस्ट :

मेहंदी पेस्ट तयार करण्यासाठी 8 तास अगोदर पाण्यामध्ये एकत्र करून रात्रभर तसचं ठेवा. आता मेहंदीमध्ये चहा पावडरचं पाणी आणि थोडसा लिंबाचा रस एकत्र करा. तुम्ही या पेस्टमध्ये आवळ्याची पावडरही एकत्र करू शकता. 

मेहंदी पेस्ट लावा :

सर्वात आधी पांढऱ्या केसांचे पार्टिशन करून मेहंदी लावा. तुम्ही केसा बांधूही शकता. जर तुम्हाला मेहंदी लावण्यासाठी हातांचा वापर करायचा नसेल तर तुम्ही ब्रशच्या मदतीने मेहंदी लावू शकता. 

थोडा वेळ तसचं ठेवा :

मेहंदी पेस्ट लावल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांसाठी तसचं ठेवा. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही शॉवर कॅपही घालू शकता. 

केस धुवून टाका :

30 मिनिटांनी केस धुवून टाका. केस धुताना लक्षात ठेवा की, केसांची सर्व मेहंदी निघून गेली पाहिजे. यासाठी थोडा वेळा लागू शकतो, परंतु केसांमधून सर्व मेहंदी निघून जाईल याची काळजी घ्या. केस चमकदार करण्यासाठी केस धुवून झाल्यानंतर त्यांना कंडिशनर लावा. 


Web Title: Easy steps to apply henna will not show a single grey hair
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.