झटपट चेहरा उजळवण्यासाठी 'हे' उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 05:48 PM2018-09-16T17:48:41+5:302018-09-16T17:52:58+5:30

सर्व महिलांची आपलं सौंदर्य जपण्यासाठी धडपड सुरू असते. पार्लरमध्ये जाऊन विविध ट्रिटमेंट करण्यात येतात. तर अनेक थेरपींचा आधार घेण्यात येतो. अनेकदा तर बाजारात मिळणारी उत्पादनं वापरण्यात येतात.

easy home remedies for glowing skin | झटपट चेहरा उजळवण्यासाठी 'हे' उपाय करा!

झटपट चेहरा उजळवण्यासाठी 'हे' उपाय करा!

googlenewsNext

सर्व महिलांची आपलं सौंदर्य जपण्यासाठी धडपड सुरू असते. पार्लरमध्ये जाऊन विविध ट्रिटमेंट करण्यात येतात. तर अनेक थेरपींचा आधार घेण्यात येतो. अनेकदा तर बाजारात मिळणारी उत्पादनं वापरण्यात येतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांचा वापर केल्यामुळे तुम्हाला त्वचा उजळवण्यास मदत होईल. 

1. जर तुम्ही तुमची त्वचा उजळवण्यासाठी उपाय शोधत असाल तर गुलाब पाण्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावू शकता. अर्ध्या तासाने थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. असं केल्याने तुमची त्वचा उजळवण्यास मदत होईल. 

2. एक कप मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा. अर्धा तासाने चेहरा पाण्याने धुवून घ्या. असं केल्याने तुम्हाला इस्टंट ग्लो मिळेल, तसेच यामुळे त्वचेला कोणतेही साइड इफेक्ट्स होणार नाहीत. 

3. डाळिंबाच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 1 तासानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. डाळिंब आणि लिंबामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन आणि अॅन्टीऑक्सिडंट अस्तित्वात असतात. जे त्वचेच्या समस्या दूर करण्यासोबतच त्वचा उजळवण्यासही मदत करतात.

4. जर तुमच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स येत असतील तर त्यावर पपईचा वापर करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कच्च्या पपईचा रस चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर पाण्याने धुवून टाका. असं केल्याने पिंपलची समस्या दूर होईल.

Web Title: easy home remedies for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.