वापरलेल्या टी बॅगचा असाही होतो वापर... त्वचा आणि केसांसाठी ठरतं फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:57 PM2018-08-22T12:57:02+5:302018-08-22T13:09:27+5:30

आपण टी बॅगचा वापर केल्यानंतर ती टाकून देतो. पण तुम्हाला माहीत आहेत का? एकदा वापरल्यानंतरही टी बॅगचे एनेक फायदे आहेत जे आपल्याला मागीत नाहीत.

do you know about these beauty hacks of used tea bags | वापरलेल्या टी बॅगचा असाही होतो वापर... त्वचा आणि केसांसाठी ठरतं फायदेशीर!

वापरलेल्या टी बॅगचा असाही होतो वापर... त्वचा आणि केसांसाठी ठरतं फायदेशीर!

Next

आपण टी बॅगचा वापर केल्यानंतर ती टाकून देतो. पण तुम्हाला माहीत आहेत का? एकदा वापरल्यानंतरही टी बॅगचे एनेक फायदे आहेत जे आपल्याला मागीत नाहीत. जाणून घेऊयात टी बॅगच्या फायद्यांबाबत आणि तिचा वापर कसा करायचा त्याबाबत...

त्वचेसाठी फायदेशीर

अनेक लोकांना माहीत नसतं की, चहा पावडरमध्ये त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी आवश्यक असे गुणधर्म आढळून येतात. त्यासाठी वापरलेली टी बॅग कोमट पाण्यामध्ये टाका आणि त्यामध्ये आपले पाय बुडवा. यामुळे तुमच्या पायांना होणाऱ्या वेदना कमी होतील आणि पायांच्या त्वचेवरील मृत पेशी निघून जाण्यासही मदत होईल. 

केसांसाठी फायदेशीर

टी बॅग कोमट पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणी थंड करून घ्यावं. त्यानंतर या पाण्याने केस धुवून 10 मिनिटांसाठी तसेच ठेवा. जर शक्य असेल तर केसांना मालिशही करू शकता. त्यानंतर शॅम्पूने केस धुवून टाका. यामुळे तुमचे केस  डॅड्रफ फ्री, मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त डोळ्यांसाठीही टी बॅग फायदेशीर ठरते. टी बॅग 5 मिनिटांसाठी डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे डोळ्यांचा थकवा निघून जाईल आणि आराम मिळेल. 

असाही करू शकता टी बॅगचा वापर...

- चहा तयार केल्यानंतर टी बॅग फेकण्याऐवजी एका डब्यामध्ये एकत्र करून ठेवा. जेव्हा 10 ते 20 टी बॅग जमा होतील त्यानंतर त्या पाण्यामध्ये टाकून उकळून घ्या. हे पाणी थंड झाल्यानंतर ते पाणी कुड्यांमध्ये घाला. यामुळे कुंड्यांमध्ये लावलेल्या झाडांवर फंगल इन्फेक्शन होणार नाही. याव्यतिरिक्त टी बॅग ओपन करून तुम्ही त्यातील चहापावडरचा वापर खत म्हणूनही करू शकता. 

- अनेक जण नाश्त्यासाठी ओट्स खाणं पसंत करतात. यासाठी ओट्स किंवा पास्ता तयार करण्याआधी ग्रीन टी बॅगसोबत काही वेळासाठी ठेवा. त्यानंतर ओट्स किंवा पास्ता तयार करा. त्यामुळे एक नवीन टेस्ट ओट्स आणि पास्ताला मिळते.

- वापर केलेल्या टी बॅग सुकवून आपल्या शूजमध्ये ठेवा. त्यामुळे शूजमधून येणारा दुर्गंध दूर होतो. याव्यतिरिक्त फ्रिजमधून येणारा दुर्गंध दूर करण्यासाठीही टी बॅगचा वापर करता येतो. 

- टी बॅग पाण्यामध्ये  घालून उकळवून घ्या. हे पाणी थंड झाल्यानंतर याचा वापर खिडक्या आणि काच साफ करण्यासाठी वापरा. 

- ड्राय टी बॅगमध्ये काही अरोमा ऑईलचे थेंब घाला आणि घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवा. हे एअर फ्रेशनर म्हणून काम करेल. याशिवाय एका न वापरलेल्या टी बॅगमध्ये पेपरमिंट किंवा स्ट्राँग अरोमा ऑईल घालून ते कपाटामध्ये ठेवा. त्यामुळे कपाटातून येणारा दुर्गंधकमी होण्यास मदत होईल. 

Web Title: do you know about these beauty hacks of used tea bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.