Do not always like to look younger! | नेहमी तरुण दिसणे कोणाला आवडणार नाही !

तारुण्य हे दर्शवते की आपण स्वत:ची कशाप्रकारे काळजी घेतली आहे आपण स्वत:ला कसं सांभाळत आहोत. टापटीप आणि व्यवस्थित राहणे हे सुद्धा तुम्हाला तारुण्याचा अनुभव देऊ शकते तसेच तारुण्याचा अनुभव तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करते.आपल्याला स्वत:बद्दल आदर वाटावा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण तरुण दिसणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणूनच तुम्ही सौंदर्यप्रसाधना शिवाय काही साध्या उपायांनी तरुण कसे दिसला हे आपण जाणून घेऊया...

चेहऱ्याचेसौंदर्य हे चेहऱ्याच्या स्वच्छ आणि नीटनेटका दिसण्यात असते. त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आळस आणि कंटाळा न करता रोज वेळोवेळी चेहरा स्वच्छ धुणे. बाहेरून आल्यावर तुम्हांला सूट होणायºया फेसवॉशने किंवा उटणं याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा तरी चेहºयाला घरगुती फेसपॅक लावून मसाज करा.

एक घटक जो तुम्ही तरुण दिसण्यात भर घालू शकतो ते म्हणजे तुमचे हसू , तुमचे हसणे हे तुम्हांला नेहमी सुंदर आणि तरुण ठेवते. त्यामुळे या हस्यासाठी तुम्हांला तुमच्या दातांची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचे सुंदर मोत्यांसारखे दात तुम्हांला अजून तरुण बनवतील.

चेहऱ्यावरचे अतिरिक्त केस, आयब्रो वेळच्यावेळी याची वेळच्या वेळी काळजी घ्या. तुमच्या चेहऱ्याच्या ठेवण असेल त्यानुसार आणि तुम्हांला सांभाळायला सोप्पे जातील अशी केशरचना करा. 

तुम्ही जर चेहऱ्यासाठी आणि त्वचेसाठी कोणत्याही प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरात असाल तर ते तुमची त्वचा स्वच्छ करताना तुमच्या चेहऱ्याचा आणि त्वचेचा नैसर्गीक थर आणि ओलसरपणा कमी करत तर नाही ना? याची खात्री करून घ्या. तुमची सौंदर्यप्रसाधने तुमची त्वचा रुक्ष आणि कोरडी तर बनवत नाही ना हे देखील पडताळून पहा. मॉस्चरायझरचा वापर करत असला तर तुमच्या त्वचेला सूट होणारं मॉस्चरायझर वापरा. खूप तेलकट नसणारे पण त्वचेतील ओलावा टिकवून ठेवणारे मॉस्चरायझर वापरा, उन्हात जाताना त्वचेची काळजी घ्या.

तुम्ही घालत असणारे कपडे हे तुमचे व्यक्तिमत्व दर्शवत असतात. आणि तरुण दिसणे म्हणजे चालू फॅशनचे कपडे घालणे असं नाही तर त्याबरोबर तूम्हाला तुमच्या शरीराला कोणते कपडे आरामदायक वाटतात. फॅशन करताना देखील तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि तुम्हांला आरामदायक कपड्याची निवड करावी. प्रसन्न वाटणारे रंगाचे कपडे घालावे उगाच मळकट ढगळ कपडे घालू नये.

तरुण दिसण्यासाठी एक महत्वाचं घटक म्हणजे संतुलित आहार. त्यासाठी तुम्हांला तुमच्या आहारात बदल करणे गरजेचे आहे. तुम्ही घेत असलेला आहार हा संतुलित सकस आहे ना? याची काळजी घ्या. संतुलित आहार म्हणजे तुम्ही तुमचे आवडते फास्ट फूड खाणे कायमचे बंद करा असे नाही. असते झाले तर उत्तम पण ते शक्य न झाल्यास त्याचे प्रमाण कमी करा. त्यासाठी पर्यायी आहार निवडा.

तरुण आणि निरोगी राहण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. तुम्हांला झेपेल तुम्हांला आवडेल अशा प्रकारचा थोडातरी व्यायाम दिवसभरातून झालाच पाहिजे. योगा, जिम आधी पयार्यांचा वापर तुम्ही करू शकता.

तुम्ही कितीही व्यस्त असाल तरी रात्री ७-८ तास झोप झालीच पाहिजे. पुरेशा झोपेमुळे तुमचा थकवा कमी होईल. त्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न होईल आणि तुम्ही नेहमी ताजे-तवाने दिसाल. पुरेश्या झोपेचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत.

तुम्हांला तरुण दिसण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी वरील काही सध्या टिप्स नक्कीच उपयुक्त ठरतील आणि मनाने तर तुम्ही तरुण आहातच..... आणि कायम असाल.

Also Read : ​Beauty : चाळीशीनंतरही तरुण दिसण्यासाठी ‘या’ आहेत खास टिप्स !
                     Beauty : ​फुल दाढी येण्यासाठी लिंबूचा असा करा वापर !
Web Title: Do not always like to look younger!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.