चॉकलेट मास्कने या ३ प्रकारे चमकवा चेहरा, डागांपासून मिळेल सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 12:05 PM2018-09-06T12:05:15+5:302018-09-06T12:06:02+5:30

चॉकलेटचं नाव घेताच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. चॉकलेट आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासोबतच आपल्या आरोग्यासाठीही किती चांगलं आहे हे सर्वांना माहीत आहेच.

Chocolate mask for glowing face acne | चॉकलेट मास्कने या ३ प्रकारे चमकवा चेहरा, डागांपासून मिळेल सुटका!

चॉकलेट मास्कने या ३ प्रकारे चमकवा चेहरा, डागांपासून मिळेल सुटका!

Next

(Image Credit : Lifeberrys.com)

चॉकलेटचं नाव घेताच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. चॉकलेट आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासोबतच आपल्या आरोग्यासाठीही किती चांगलं आहे हे सर्वांना माहीत आहेच. यासोबतच चॉकलेट त्वचेसाठीही फार फायदेशीर मानलं जातं. आतापर्यंत चॉकलेट फेशिअलचं नाव ऐकलं होतं पण आता बाजारात यापासून तयार वॅक्सिंग, बॉडी पॉलिशिंग, मेनिक्योर, पेडिक्योर आणि फेस मास्क उपलब्ध आहेत. 

याने केवळ चेहऱ्यावरील डागच नाही तर कोरडी त्वचा आतून मॉयस्चराइज करण्याचंही काम करतं. याच्या उपयोगाने चेहऱ्याचे फाइन लाइन्स दूर होतात आणि त्वचेवर ग्लो येतो. चॉकलेटच्या वापराने तुम्ही तुमचं सौंदर्य आणखी खुलवू शकता. 

डाग दूर होतील

चॉकलेटमध्ये असलेल्या अॅंटी-ऑक्सिंडेट्समुळे सुरकुत्या, डाग आणि जखमेचे डाग दूर केले जाऊ शकतात. घरात याचं फेसपॅक तयार करण्यासाठी १/4 कोकोआ पावडरमध्ये तीन चमचे मध आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून चांगलं मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावा. थोड्या वेळाने चेहरा धुवा. याने तुमची त्वचा मुलायम झाली असेल आणि चेहऱ्यावर ग्लो सुद्धा आलेला असेल.

दूर होईल ड्रायनेस

डार्क चॉकलेटमध्ये व्हिटॅमिन, कॅल्शिअम आणि आयर्न असतं. यापासून तयार मास्क चेहऱ्यावर लावल्यास नैसर्गिक ग्लो मिळतो. घरी हे तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे कोकोआ पावडर, १ चमचा ताजं क्रिम, १ चमचा मध आणि २ चमचे ओटमील यांचं मिश्रण तयार करा. हा मास्क आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला काही दिवसातच फरक दिसेल. 

त्वचेचा ओलावा कायम राहणार

चॉकलेटपासून तयार मास्क फेशिअलमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतं. याने चेहऱ्याचा मुलायमपणा आणि ओलावा कायम राहतो. याने त्वचेवर पिंपल्स आणि जखमेचे डागही दिसणार नाही. याने चेहरा आणखी मुलायम होतो.

सुरक्षा कवच

उन्हाच्या घातक किरणांपासून बचाव करण्यासाठी महिला नेहमी सनस्क्रीन क्रीम किंवा लोशनता वापर करतात. पण यासाठी एक्स्ट्रा खर्च करण्याची गरज नाहीये. घरीच चॉकलेट वितळवून ते थंड झाल्यावर त्वचेवर लावा. हा मास्क कोरडा झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून किमान एकदा हा उपाय करा. याने उन्हाच्या किरणांपासून बचाव होईल.
 

Web Title: Chocolate mask for glowing face acne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.