Bridal Beauty Tips : लग्नाच्या दिवशी दिसायचंय 'सुंदर'?; तर चुकून करू नका 'या' गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 11:11 AM2018-12-08T11:11:24+5:302018-12-08T11:12:48+5:30

आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं, प्रत्येकाच्या नजरा आपल्यावर खिळाव्यात अशी प्रत्येक नववधूची इच्छा असते. जर तुमच्या लग्नाची तारिख जवळ आली आसेल आणि तुमच्या लग्नात तुम्हाला सुंदर दिसायचं असेल, तर तुम्ही आतापासूनचं तुमच्या स्किनची काळजी घेण्यास सुरूवात करणं गरजेचं आहे.

Bridal Beauty Tips dos and donts for all the brides to be | Bridal Beauty Tips : लग्नाच्या दिवशी दिसायचंय 'सुंदर'?; तर चुकून करू नका 'या' गोष्टी

Bridal Beauty Tips : लग्नाच्या दिवशी दिसायचंय 'सुंदर'?; तर चुकून करू नका 'या' गोष्टी

Next

आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं, प्रत्येकाच्या नजरा आपल्यावर खिळाव्यात अशी प्रत्येक नववधूची इच्छा असते. जर तुमच्या लग्नाची तारिख जवळ आली आसेल आणि तुमच्या लग्नात तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही आतापासूनचं तुमच्या स्किनची काळजी घेण्यास सुरूवात करणं गरजेचं आहे. तुमची परफेक्ट स्किनच तुम्हाला लग्नाच्या दिवशी सुंदर आणि ग्लोइंग लूक देण्यास मदत करेल. कारण तुम्ही कितीही महागडा मेकअप केला तरिही तुमची स्किन हेल्दी असणं गरजेचं आहे. नाहीतर काही वेळाने मेकअप काळपट दिसण्याची भिती असते. 

तुम्ही जर लवकरच बोहल्यावर चढणार असाल तर आज आम्ही तुम्हाला 5 अत्यंत महत्त्वाच्या स्किन केअर टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यामुळे लग्नाच्या दिवशी तुमची स्किन नैसर्गिक पद्धतीने सुंदर दिसण्यास फायदा होईल. त्यामुळे लग्नातील फोटो सुंदर येण्यासोबतच तुमचा नववधू साज आणखी खुलवण्यास मदत होईल. जाणून घेऊया नववधू होणाऱ्या तरूणींना आपल्या स्किन केयर रूटीनमध्ये काय करणं गरजेचं आहे आणि काय करू नये त्याबाबत...

1. सतत चेहऱ्यावर हात लावू नका

आपल्या चेहऱ्यावर सतत हात लावणं कटाक्षाने टाळा. कारण आपले हात दिवसभरात अनेक वस्तूंना स्पर्श करत असतात. वातावरणातील अनेक बॅक्टेरिया त्या वस्तूंवर असतात. त्यांना स्पर्श केल्यामुळे ते आपल्या हातांना लागतात आणि हातांमार्फत चेहऱ्यावरील त्वचेवर पसरतात. परिणामी पिंपल्स आणि इन्फेक्शन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. हात धुतल्यामुळे हातावरील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते परंतु चेहऱ्याच्या त्वचेवर पसरलेले बॅक्टेरिया सहजा सहजी जात नाहीत. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे डाग आणि पिंपल्सपासून रक्षण करण्यासाठी चेहऱ्यावर सतत हात लावणं टाळा. 

2. घरगुती वस्तूंचा वापर करा

तुमच्या लग्नाची तारिख जवळ येत असेल तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या महागड्या आणि केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करणं टाळा. त्याऐवजी त्वचेसाठी घरातील नॅचरल पदार्थांचा वापर करा. चेहरा तजेलदार करण्यासाठी होममेड फेस पॅकचा वापर करा. लांब आणि दाट केसांसाठी नियमितपणे केसांना तेल लावून मसाज करा. शक्य असल्यास घराबाहेर पडणं टाळा. त्यामुळे वातावरणातील धूळ आणि प्रदुषणापासून त्वचेचं रक्षणं होण्यास मदत होईल. 

3. व्यवस्थित माहीती घेतल्यानंतरच स्किन ट्रिटमेंट घ्या

जर तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागड्या फेशिअल ट्रिटमेंट घेण्याचा विचार करत असाल तर, कमीत कमी 3 ते 4 स्किन एक्सपर्टचा सल्ला घ्या. कारण फेशिअल ट्रिटमेंट अनेक प्रकारच्या असतात. त्यामुळे त्या ट्रिटमेंटपैकी कोणती ट्रिटमेंट तुमच्या स्किनला सूट होईल, याची माहिती घेऊनच ती ट्रिटमेंट घ्या. 

4. या गोष्टींपासून दूर रहा

स्किन केयरसाठी फक्त कॉस्मॅटिक प्रोडक्ट्सच नाही तर योग्य ते डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. आहारामध्ये पौष्टीक पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. कोल्डड्रिंक किंवा तेलकट पदार्थ खाणं टाळा. 

5. भरपूर झोप घ्या 

लग्नाच्या दिवशी अनेक नववधूंच्या डोळ्यांखाली स्ट्रेस किंवा काळी वर्तुळं दिसून येतात. कितीही मेकअप केला तरिही ही वर्तुळं लपवणं कठिण होतं. त्यामुळे आतापासूनच तुमचं झोपेचं रूटीन फिक्स करा आणि शक्य असल्यास भरपूर झोप घ्या. कारण त्यामुळे तुमची स्किन फ्रेश दिसण्यास मदत होईल. 

Web Title: Bridal Beauty Tips dos and donts for all the brides to be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.