महागडे स्पा नाही तर उन्हाळ्यामध्ये ट्राय करा 'हे' नॅचरल हेयर मास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:03 PM2019-04-21T16:03:28+5:302019-04-21T16:04:23+5:30

उन्हाळ्यामध्ये घाम आणि उकाड्यामुळे केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच उकाड्यापासून बचाव करण्यासाठी एसीचा वापर जास्त करण्यात येतो. एसीमुळे केस अधिक कोरडे होतात.

Best natural hair conditionrs and mask in summers | महागडे स्पा नाही तर उन्हाळ्यामध्ये ट्राय करा 'हे' नॅचरल हेयर मास्क

महागडे स्पा नाही तर उन्हाळ्यामध्ये ट्राय करा 'हे' नॅचरल हेयर मास्क

Next

उन्हाळ्यामध्ये घाम आणि उकाड्यामुळे केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच उकाड्यापासून बचाव करण्यासाठी एसीचा वापर जास्त करण्यात येतो. एसीमुळे केस अधिक कोरडे होतात. अशातच या सर्व समस्यांपासून बचाव करण्यासाठी केसांची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. तसं पाहायला गेलं तर या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी अनेक उत्पादनं बाजारामध्ये उपलब्ध असतात. परंतु त्याऐवजी नॅचरल मास्कचा वापर करून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता. 

यॉगर्ट मास्क

एका बाउलमधये अंड फेटून घ्या यामध्ये सहा मोठे चमच दही एकत्र करा. तयार पेस्ट केसांमध्ये व्यवस्थित लावा. अर्ध्या तासाने साध्या पाण्याने केस धुवून घ्या. दह्यामध्ये अस्तित्त्वात असलेलं प्रोटीन केसांना हेल्दी आणि मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

बनाना हेयर मास्क

एक केळ घेऊन ते व्यवस्थित स्मॅश करून घ्या. त्यामध्ये तीन चमचे मध, तीन चमचे दूध आणि तीन चमचे ऑलिव्ह ऑइल किंवा ऑर्गन ऑइल एकत्र करा. तयार पेस्ट केसांना अर्ध्या तासासाठी लावून धुवून टाका. डॅमेज केसांसाठी हा मास्क अत्यंत फायदेशीर ठरतो. 

दही मास्क

जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर दह्यामध्ये थोडसं दूध एकत्र करून केसांना लावा. हे अर्ध्या तासामध्ये तुमचे केस मुलायम करण्यासाठी मदत करतं. 

हिना हेयर मास्क

मेहंदी केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तसेच केसांना कंडिशनिंग करण्यासाठी मेहंदी उत्तम उपाय आहे. जर तुम्ही फक्त कंडिशनिंगसाठी वापर करत असाल तर अर्धा तास किंवा 45 मिनिटांपर्यंत केसांना लावा. ही केसांमध्ये शाइन आणण्यासाठी मदत करते. परंतु मेहंदी जास्त वेळ केसांना ठेवू नका. त्यामुळे केस ड्राय होतात. मेहंदी दूध किंवा साधअया पाण्यामध्ये भिजवून त्यामध्ये थोडं लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करा. त्यामुळे केसांचा ड्रायनेस निघून जातो. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी  फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Best natural hair conditionrs and mask in summers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.