कोरड्या आणि मुलायम केसांसाठी सीरम करतं मदत; 'हे' होतात फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 01:53 PM2019-03-16T13:53:05+5:302019-03-16T13:55:11+5:30

केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि वाढीसाठी तुम्हाला अनेक हेयर एक्सपर्ट्स किंवा तज्ज्ञांकडून हेयर सीरम वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. हेयर सीरम एक असं लिक्विड असतं, ज्यामध्ये अमीनो अॅसिड, सिरेमाइड आणि सिलिकॉन असतं.

Beauty worried about dry and damaged hair then apply hair serum know the benefits | कोरड्या आणि मुलायम केसांसाठी सीरम करतं मदत; 'हे' होतात फायदे

कोरड्या आणि मुलायम केसांसाठी सीरम करतं मदत; 'हे' होतात फायदे

Next

केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि वाढीसाठी तुम्हाला अनेक हेयर एक्सपर्ट्स किंवा तज्ज्ञांकडून हेयर सीरम वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. हेयर सीरम एक असं लिक्विड असतं, ज्यामध्ये अमीनो अ‍ॅसिड, सिरेमाइड आणि सिलिकॉन असतं. परंतु, तुम्ही तुमच्या घरीच वेगवेगळ्या तेलांचा वापर करून हेयर ग्रोथ सीरम तयार करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमच्या डोक्याची त्वचा आणि केसांचं आरोग्य लक्षात घेऊन सीरम वापरू शकता. 

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याच्या समस्यांसोबतच त्वचेच्या समस्यांचाही सामना करावा लागतो. अनेकदा सतत बाहेर असल्यामुळे केसांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तर अनेकदा पोषणाच्या कमतरतेमुळे केस डॅमेज होतात किंवा कोरडे होतात. याचाच अर्थ असा की, केसांची काळजी घेणं आवश्यक असतं. यांचा बाहेरील प्रदूषणापासून बचाव करून दाट आणि मुलायम करण्यासाठी तुम्ही हेयर सिरमचा वापर करू शकता. जाणून घेऊया हेयर सीरमचा लावण्याच्या फायद्यांबाबत...

केस चमकदार होण्यासाठी 

हेयर सीरममध्ये सिलिकॉन असतं. जे केसांमध्ये जाऊन त्यांना चमकदार करण्यासाठी मदत करतं. हे कोरडे, शुष्क आणि खराब दिसणाऱ्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. 

केसांचा गुंता कमी होण्यासाठी 

सीरम लावल्याने केसांचा जास्त गुंता होत नाही. कारण केसांना सीरम लावल्याने केस सॉफ्ट होतात, ज्यामुळे त्यांचा गुंता होत नाही. परिणामी केस तुटण्यापासून बचाव होतो.

केसांच्या लांबीनुसार सीरमचा वापर करा

हेयर सीरमला केसांच्या लांबीनुसार कव्हर करून लावणं गरजेचं असतं. सीरम केसांच्या मुळांशी न लावता केसांवर लावणं जातं. जर केसांच्या मुळांशी सीरम लावलं, तर ते ऑयली होतात. चांगल्या परिणामासाठी सीरम ओल्या केसांमध्येच लावा. 

यूव्ही प्रोटेक्शन 

प्रदूषण, धूळ-माती, प्रखर सूर्यकिरणं इत्यादींपासून केसांचा बचाव करण्यासाठी सीरम उपयोगी ठरतं. हे लावल्याने केस कोरडे दिसत नाहीत. काही खास हेयर सीरम्समध्ये यूवी प्रोटेक्शन फॉर्म्युला असतो. कंडीशनिंग तेलाऐवजी तुम्ही हेयर सीरमचा वापर करून केसांना सुंदर करू शकता. यामुळे केस चिपचिपित दिसत नाहीत आणि त्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते. 

हेअर स्टाइल करताना फायदेशीर

केसांना स्ट्रेट किंवा कर्ल करण्यासाठी जेव्हा तुम्ही रॉडचा वापर करता, त्यावेळी केस खराब होऊ शकतात. परंतु, जर तुम्ही केसांवर हेयर सीरम लावून त्यानंतर गरम रॉडचा वापर केला तर केसांना काही नुकसान पोहोचणार नाही. 

Web Title: Beauty worried about dry and damaged hair then apply hair serum know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.