Beauty Tips: To make more youth, eat these '6' foods! | Beauty Tips : ​अधिक तरूण दिसण्यासाठी या ‘६’ पदार्थांचे करा सेवन !

आपण म्हातारे दिसावे असे कुणाला वाटते. आपण नेहमी चिरतरूण दिसावे, वाढत्या वयाच्या खुणा दिसू नयेत, त्यासाठी बहुतेकजण काय काय नाही प्रयोग करत असतात. विशेषत: प्रत्येक सेलिब्रिटी तर नेहमी तरूण दिसण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. मात्र निसर्गाच्या नियमानुसार वय वाढल्यानंतर चेहरा निस्तेज होऊ लागतो, चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात आणि आपले सौंदर्य खालावत जाते. बऱ्याचजणांना वाढत्या वयासोबत आपण आकर्षक दिसावं असं वाटत असतं. आपणासही असे वाटत असेल तर काही पदार्थ्यांच्या सेवनाने आपण तरूण आणि फिट दिसू शकता. 

* बदाम 
बदाम खाल्ल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. जी हेल्थ आणि ब्रेन दोन्ही गोष्टींना मजबूत करते. यात मोनो सॅच्युरेटेड वसा-प्रोटीन आणि पोटॅशिअम सुद्धा असतं. याचे सेवन केल्यास शरिरात शक्ती आणि चमक राहते.  

 * सफरचंद
सफरचंदमध्ये पेक्टिन असतं. जे स्किन टोनरच्या रूपात घेतलं जातं. त्यासोबतच यात अ‍ॅँटी आॅक्सीडेंट आणि फ्रूट अ‍ॅसिड सुद्धा असत. जर दररोज याचं सेवन केलं तर तुमच्या शरिरात आणि चेह-यावर चमक राहते.

* दही 
दही खाणे हे वाढत्या वयासाठी खूप लाभदायक मानलं जातं. दही हे कॅल्शिअमचं चांगलं स्त्रोत मानलं जातं. त्यासोबतच यात जीवित बॅक्टेरिया असतात जे पचनासाठी फायद्याचे असतात. दही रोज खाल्ल्यास त्यामुळे त्वचेवर चमक दिसते.

* पपई  
पपई सुद्धा जवान-तरूण दिसण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावते. यात व्हिटॅमिन ए, बी, सी मॅग्नेशिअमने भरपूर अ‍ॅँटी आॅक्सीडेंट आणि पपेन नावाचं एनजाईम असतं. ज्यामुळे याचे सेवन केल्यास त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत.

* केळी  
केळी हे फळ सदाबहार फळांमध्ये येतं. यात पोटॅशिअम आणि विटामिस-सी मोठ्या प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टी केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगले असतात. हे पचनक्रियेसाठी फायदयाचे आहे.

* टोमॅटो 
टोमॅटो सर्वात चांगलं अ‍ॅँटी एजिंग फूड मानलं जातं. यात लाइकोपिन आढळलं. त्यासोबतच यात त्वचेला तरूण ठेवणारे अ‍ॅँटी आॅक्सीडेंट्स सुद्धा असतात. त्यामुळे तरूण दिसण्यासाठी टोमॅटो खाणे अधिक फायद्याचे असते.  
Web Title: Beauty Tips: To make more youth, eat these '6' foods!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.