चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी करा हे खास उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 11:27 AM2018-07-04T11:27:16+5:302018-07-04T11:28:06+5:30

चारचौघांमध्ये लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला हे चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्याचे काही खास उपाय सांगणार आहोत.

Beauty Tips : How to remove unwanted hair from face | चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी करा हे खास उपाय!

चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी करा हे खास उपाय!

googlenewsNext

प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं, आपला चेहरा आकर्षक दिसावा असं वाटत असतं. पण काहींना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकांना चेहऱ्यावरील केसांमुळे फारच त्रास होतो. हे चेहऱ्यावरील नको असलेले किंवा विनाकारणचे केस दूर करण्यासाठी महिला आणि पुरुष वेगवेगळे उपाय करतात. पण काहींना यावर उपाय माहीत नसतात आणि त्यामुळे चारचौघांमध्ये लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला हे चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्याचे काही खास उपाय सांगणार आहोत.

1) रेजर

चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी शेव्हिंग हा सरळ उपाय आहे. पुरुष हा उपाय वापरतात. पण महिलांनी याचा वापर करु नये कारण याने केस दूर केल्यास काही दिवसांनी केस पुन्हा दिसायला लागतात. त्यासोबतच शेव्हिंग केल्याने केस आणखी जास्त हार्ड होतात. 

2) थ्रेडिंग आणि ट्वीजिंग

चेहऱ्यावर नको असलेले केस हे महिलांच्या ओठांच्या वर, माथ्यावर, दाढीवर असतात. तर परुषांच्या गालांवर आणि भुवयांच्या मधे असतात. त्यासोबत चेहऱ्यावर आणखीही काही ठिकाणांवर हे केस येतात. थ्रेडिंगच्या माध्यमातून के नको असलेले केस दूर केले जाऊ शकतात. गाल आणि भुवयांच्या मधे असलेले केस महिला प्लकिंग करुन काढू शकतात. 

3) डेपिलोटोरिएसचा करा वापर

डेपिलोटोरिएस हे एक केमिकल असून त्वचेवरील नको असलेले केस दूर करण्यास याची मदत होते. हे केमिकल वापरताना त्यासाठी देण्यात आलेले नियम पाळावे. हे केमिकल चेहऱ्यावर लावल्यावर स्वच्छ कपड्यांनी चेहरा पुसावा. 

4) ब्लीचिंग

ब्लीचिंगनेही चेहऱ्यावरील नको असलेले केस नाहीसे होतात. हा उपाय महिला आणि पुरुष दोघेही वापरु शकतात. पण ब्लीचिंग करण्याआधी ते तुमच्या त्वचेला सूट होतं की नाही हे तपासून बघाने. तसे न केल्यास त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. 

5) व्हॅक्सिंग

व्हॅक्सिंगनेही त्वचेवरील नको असलेले केस दूर करता येतात. अलिकडे हा उपाय महिलांसोबतच पुरुषही करतात. व्हॅक्सिंग केल्याने केस पुन्हा यायला बराच वेळ लागतो. कारण याने त्वचेच्या मुळातून केस काढले जातात. 

6) लेजर प्रक्रिया

लेजर प्रक्रियेच्या माध्यमातून नको असलेले केस नेहमीसाठी दूर केले जाऊ शकताता. कारण लेजर प्रक्रियेने केस मुळासकट नष्ट केले जातात. लेजरच्या किरणांच्या मदतीने केसांच्या मुळांना लक्ष्य केलं जातं. त्याने केस दूर होतात. या उपायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही प्रक्रिया केल्यावर चेहऱ्यावर कोणतेही डाग पडत नाहीत. 

Web Title: Beauty Tips : How to remove unwanted hair from face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.