BEAUTY TIPS: Drying tomatoes on the face, beauty opens! | BEAUTY TIPS : ​चेहऱ्यावर टोमॅटो घासल्याने खुलते सौंदर्य !

बरेचजण चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी महागड्या क्रीमचा वापर करतात. मात्र आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या साधारण वस्तूंचा वापर केल्यास आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढू शकते. त्यातीलच एक म्हणजे टोमॅटो. चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी टोमॅटोचा आपण सहज वापर करु शकतो. त्यासाठी टोमॅटोचा अर्धा तुकडा घेऊन चेहऱ्यावर घासा. नंतर चेहरा धुऊन घ्या. नियमित हा प्रयोग केल्याने फरक जाणवेल. शिवाय आपण टोमॅटो ज्यूसला फेस मास्कच्या रूपात वापरू शकता याने स्किन स्वच्छ होईल. चेहऱ्यावर पुरळ असतील तर टोमॅटोचा फेस मास्क तयार करु शकता. यासाठी टोमॅटो स्लाइस कापून घ्या. टोमॅटो उकळून त्याच्या सालं आणि बिया काढून वाटून घ्या. हे मिश्रण पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. एक तासाने चेहरा धुऊन घ्या. या पेस्टमध्ये काकडी किंवा दही मिसळू शकतात. फेस मास्क बनविण्यासाठी आपल्याकडे वेळ नसल्यास एका वाटीत टोमॅटो रस घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून घ्या. हे चेहऱ्यावर लावून पाच मिनिट राहून द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

Also Read : ​चॉकलेट फेशियलने खुलवा सौंदर्य !
                   : चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यासाठी !

Web Title: BEAUTY TIPS: Drying tomatoes on the face, beauty opens!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.