कोमल त्वचेसाठी वापरा हा 'जेल', घरीच अशाप्रकारे करा तयार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 11:44 AM2018-07-17T11:44:47+5:302018-07-17T11:46:17+5:30

खरंतर कोरफडीचं झाड तुम्ही घरातच लावू शकता आणि याचा फायदा करून घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला कोरफडीने चमकदार आणि कोमल त्वचा कशी मिळवायची यासाठी एक उपाय सांगणार आहोत. 

Beauty Tips : Aloevera, Rose water and Vitamin e home made gel for skin | कोमल त्वचेसाठी वापरा हा 'जेल', घरीच अशाप्रकारे करा तयार!

कोमल त्वचेसाठी वापरा हा 'जेल', घरीच अशाप्रकारे करा तयार!

googlenewsNext

हेल्थ, स्कीन आणि केस या तिन्हींची काळजी घेण्यासाठी अॅलोवेरा म्हणजेच कोरफडीचा वापर केला जातो. याच्या नियमीत वापराने आरोग्य चांगलं राहतं आणि त्यासोबतच सुंदरताही मिळते. खरंतर कोरफडीचं झाड तुम्ही घरातच लावू शकता आणि याचा फायदा करून घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला कोरफडीने चमकदार आणि कोमल त्वचा कशी मिळवायची यासाठी एक उपाय सांगणार आहोत. 

कोरफडीच्या जेलमध्ये जर गुलाब जल मिश्रित करून लावल्यास याचा कोणत्याही महागड्या उत्पादनांपेक्षा जास्त चांगला फायदा तुम्हाला मिळू शकतो. कोरफड आणि गुलाब जल या दोन्हींमध्ये अॅंटी-फंगल आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे या मिश्रणाचा उपाय केल्यास त्वचेच्या वेगवेगळ्य समस्या दूर होतात आणि नॅच्युरल ग्लो बघायला मिळतो. याने तुमचा पार्लरमध्ये होणारा खर्चही कमी होऊ शकतो. चला जाणून घेऊ कसा तयार करायचा हा फेस पॅक....

आवश्यक सामग्री

- कोरफडीचे दोन-तीन फ्रेश स्टेम घ्या.

- गुलाब जल

- व्हिटॅमिन-ई ऑइल किंवा व्हिटॅमिन-सी पावडर

कसे कराल तयार

- सर्वातआधी कोरफडचीचे दोन-तीन स्टेम घ्या. त्यावरची कवच काढून टाका. आता तुम्हाला आत फ्रेश जेल दिसू लागेल. ते चमचा किंवा बोटांत्या मदतीने वाटीमध्ये काढा. हे जेल मिक्सरमधून एकदा बारीक करा.

- त्या जेलमध्ये गुलाब जल आणि व्हिटॅमिन-इ ऑइल मिश्रित करून पुन्हा मिक्सरमधून काढा.

- जर तुम्हाला जेलचं प्रमाण अधिक हवं असेल तर गुलाब जल आणि व्हिटॅमिन-इ ऑइल जास्त मिश्रित करा.

- नंतर हे जेल बोटांच्या मदतीने किंवा ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. हे १५ ते २० मिनिटे तसंच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. 

किती वेळा करायचा वापर?

कोरफड आणि गुलाब जलचं मिश्रण एक दिवस सोडून किंवा आठवड्यातून ३ वेळा वापर करा. याने चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग दूर होतात. गुलाब जलमुळे चेहऱ्यावर ग्लो येईल आणि कोरफडीमुळे त्वचा हायड्रेट होईल. 
 

Web Title: Beauty Tips : Aloevera, Rose water and Vitamin e home made gel for skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.