Beauty: These are the 'special' tips to look younger after 40 years! | ​Beauty : चाळीशीनंतरही तरुण दिसण्यासाठी ‘या’ आहेत खास टिप्स !

-रवींद्र मोरे 
अभिनेत्रींचे सौंदर्य आणि फिटनेस याच्यावरच त्यांचे करिअर अवलंबून असते. म्हणून असे म्हटले जाते की, जसे वय वाढते तसे त्यांचे करिअर धोक्यात येत असते. कारण वाढत्या वयाची चिन्हे त्यांच्या चेहऱ्यावर जाणवू लागतात. जसजसे वय वाढत जाते तसे त्यांचे सौंदर्य खालावत जात असल्याने त्यांना चिंता सतावू लागते. मात्र चित्रपटसृष्टीत अशा काही अभिनेत्र्या आहेत, ज्यांनी चाळीशी पार केली आहे तरीही त्यांचे सौंदर्य आजही टिकून आहे. आपणासही चाळीशीनंतर तारुण्य टिकवून ठेवायचे असेल तर खाली काही टिप्स दिल्या आहेत, त्या फॉलो केल्यास आपले तारुण्य टिकून राहण्यास मदत होईल. 

* त्वचेची काळजी 
चाळीशीच्या सुरुवातीला त्वचेवर सुरकुत्या जाणवू लागतात. यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे, यामुळे आपण तरुण दिसण्यास मदत होते. शिवाय त्वचेची काळजी घेणारे काही नैसर्गिक उत्पादकांचा वापर करु शकता. 

* केसांची काळजी
 वयाच्या चाळीशीनंतर शरीरात होणाऱ्या बदलामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. यामुळे टक्कलही पडू शकते. अशी समस्या आपणासही जाणवू लागत असेल तर त्वरीत एखाद्या उत्तम त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे चाळीशीनंतर केस पांढरे होण्यासही सुरुवात होते. या समस्येपासून वाचण्यासाठी केस रंगवण्यापूर्वी  तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

* योग्य सनस्क्रीनचा वापर
जसे वय वाढते तसे आपल्या चेहऱ्यावर आणि हातांवर सूर्य किरणांच्या तीव्र प्रकाशामुळे काळे डाग पडल्याचे लक्षात येते. यामुळे विपरित परिणाम होणाºया किरणांपासून संरक्षण मिळवण्यासाठी योग्य सनस्क्रीन लोशन वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

* दाताची काळजी 
आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात दातांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र चाळीशीनंतर हिरड्यांच्या अनेक समस्या येतात. यामुळे तुम्हाला दात दुखीचा किंवा हिरड्यांचा त्रास सुरु होतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.  

Also Read : ​HEALTH : पुरुषांनो, तारुण्य टिकविण्यासाठी "हे" खा !
Web Title: Beauty: These are the 'special' tips to look younger after 40 years!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.