Beauty: Special home remedies for removing facial pimples! | ​Beauty : चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्याचे खास घरगुती उपाय !

पिंपल्स तुमच्या चेहऱ्यावर, खांद्यावर, मानेवर आणि पाठीवर भलेमोठे दिसणारे डाग सोडून जातात. पिंपल्स फक्त त्वचेवर आलेली सूज आहे जी बॅक्टेरिया आणि पु ह्याने भरून जाते. सामान्यत: सुरुवातीला त्वचेवर एक गुलाबी ठिपका जसा दिसतो आणि मग नंतर शरीरावर काळे डाग बनून राहतात. जर तुम्हाला चेहऱ्यावर पिंपल्स ची समस्या होत असेल तर आम्ही तुम्हाला काही सर्वात सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुमची पिंपल्सची समस्या तर दूर होणारच शिवाय तुमचा चेहरासुद्धा तजेल राहील.

तुम्हांला माहितीच असेल पिंपल्स साठी बाजारात खूप सारी उत्पादने मिळतात पण त्या उत्पदनांमुळे साईड इफेक्ट होण्याची संभावना नाकारता येत नाही. कारण त्यामध्ये खूप हानिकारक रसायनं असतात ज्यामुळे तुमच्या चेहºयाला हानी पोहोचू शकते. पण घरगुती उपायच एकमेव उपचार आहे जे तुम्हांला कोणत्याही साईड इफेक्ट पासून वाचवू शकते.

* शूगरस्क्रब : 
हे पिंपल्स दूर करण्याचा सर्वात सोपा आणि साधा उपाय आहे. यामुळे पिंपल्स पासून निर्माण झालेलं डाग स्वच्छ करण्यास आणि त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

प्रमाण : साखर ३ चमचा, दूध एक मोठा चमचा, मध एक चमचायांचे मिश्रण करा आणि आणि चेहऱ्यावर हे मिश्रण काही मिनिटांसाठी लावून ठेवा आणि पंधरा मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा चांगला धुवा.

* बेकिंग सोडा :
तुम्हांला वाचून आश्चर्य होईल कि बेकिंग सोड्याने पिंपल्स चे डाग ठीक होऊ शकतात. बेकिंग सोडा चेहऱ्यावरील पिंपल्सची डाग हटवण्याचे काम करतो. हा एक सोपा उपाय आहे. 

प्रमाण : एक चमचा बेकिंग सोडा, पाण्याचे काही थेंब घेऊन मिश्रण तयार करा.
हे मिश्रण ज्या ठिकाणी पिंपल्स आले आहेत तिथे लावा. हे ५ मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवू नका. चेहरा स्वच्छ पाण्याने साफ धुवून घ्या.

* टॉमॅटो :
टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन ए आणि लाईकोपिन असते जी त्वचा ताजी ठेवण्यास मदत करते. व्हिटॅमिन ए त्वचा स्वच्छ आणि सुंदर बनवते. तसेच त्वचेच्या पेशी जलदगतीने वाढवण्यास मदत करते. चेहऱ्यावर टॅमोटोचा ताजागर  वाटून लावा आणि २० मिनिटं तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने साफ धुवून घ्या. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक पाहाल. तुम्ही याबरोबर काकडीचे मिश्रण सुद्धा लावू शकता. यासोबत काकडीची पेस्ट बनवा आणि टॅमाटोचा रस मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर फेस मास्क च्या रूपात लावू शकता. हे मिश्रण अर्धा तास चेहऱ्यावर तसेच ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा साफ धुवून घ्या.

* मध, हळद आणि दूध यांचे मिश्रण :
एका वाटीत दोन मोठे चमचे मध आणि अर्धे चमचे हळद पावडर घ्या. दोन चमचे दूध आणि काही थेंब गुलाब पाणी घेऊन ह्या सर्वांचे मिश्रण बनवा. नंतर जिथे पिंपल्स आहेत अशा ठिकाणी लावून ठेवा. हे मिश्रण २० मिनिटं तसेच ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा साफ धुवून घ्या. १ आठवडा नियमित असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी कमी होताना दिसतील. 
Web Title: Beauty: Special home remedies for removing facial pimples!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.