आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही भोपळा ठरतो गुणकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 05:05 PM2018-12-18T17:05:57+5:302018-12-18T17:09:17+5:30

त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपला आहार समतोल असणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही योग्य आहार घेत असाल तर त्वचेवर आपसूकच उजाळा येतो. अनेकदा त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेतो.

Beauty secrets of pumpkin | आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही भोपळा ठरतो गुणकारी

आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही भोपळा ठरतो गुणकारी

Next

त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपला आहार समतोल असणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही योग्य आहार घेत असाल तर त्वचेवर आपसूकच उजाळा येतो. अनेकदा त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेतो. पण या केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय करणं फायदेशीर ठरतं. आपल्या स्वयंपाक घरातच अनेक अशा गोष्टी असतात. ज्या त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी उपयोगी ठरतात. त्यापैकी एक म्हणजे भोपळा. अनेकदा भोपळ्याचा हलवा किंवा भोपळ्याच्या पुऱ्या असे पदार्थ घरी तयार करण्यात येतात. परंतु भोपळ्याचा उपयोग तुम्ही सौंदर्यासाठीही करता येऊ शकतो. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि ई मुबलक प्रमाणात असतं. तसेच अनेक मिनरल्स, पोटॅशिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, आयर्न यांसारखे केसांच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारे पोषक घटकही असतात. 

भोपळा सौंदर्यासाठी गुणकारी :

पिंपल्सपासून सुटका 

भोपळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झिंक आणि व्हिटॅमिन ई असतं. जे त्वचेवरील पिंपल्स आणि डाग दूर करण्यासाठी उपयोगी ठरतं. भोपळ्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावल्याने अनेक समस्यांपासून सुटका होते. 

ड्राय स्किन 

थंडीमध्ये जर तुमची स्किन फार ड्राय झाली असेल तर भोपळा तुमच्यासाठी उत्तम उपाय आहे. यामुळे स्किनचा कोरडेपणा दूर होतो. भोपळ्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. यासाठी तुम्ही भोपळ्याच्या पेस्टमध्ये दूधाची मलईही एकत्र करू शकता. 

ऑयली स्किन 

ऑयली त्वचेसाठीही भोपळा फायदेशीर ठरतो. याचा वापर केल्याने ऑयली स्किनच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते आणि त्वचा मुलायम होण्यास मदत होते. 

डार्क सर्कल्स

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बीयांच्या पावडरमध्ये गुलाब पाणी मिक्स करून तयार पेस्ट डोळ्यांखाली लावा. डार्क सर्कल्स दूर होतात. 

चमकदार केसांसाठी 

नारळाच्या तेलामध्ये भोपळ्याच्या बीया टाकून व्यवस्थित गरम करा. या तेलाने केसांना मसाज केल्याने केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. 

सौंदर्य वाढवण्यासाठी असा करा भोपळ्याचा वापर :

भोपळा आणि व्हिटॅमिन-ई तेल 

भोपळ्याचा एक तुकडा घेऊन तो स्मॅश करा. त्यामध्ये व्हिटॅमिन-ई तेल एकत्र करा. तयार मिश्रण 10 ते 15 मिनिटांसाठी त्वचेवर लावा आणि कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. 

भोपळा आणि दालचीनी पावडर 

एक चमचा भोपळ्याचा गर, एक चमचा गुलाबपाणी आणि एक चुटकी दालचिनी पावडर एकत्र करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटांपर्यंत लावून ठेवा आणि कोमट पाण्याने धुवून टाका. याचा वापर केल्याने त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत होईल. 

भोपळा आणि मध

एक चमचा भोपळ्याचा गर आणि मध एकत्र करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांनी धुवून टाका. 

भोपळा आणि दही 

एक चमचा भोपळ्याच्या रसामध्ये 2 चमचे दही एकत्र करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांसाठी ठेवा. त्वचा उजळण्यास मदत होईल. 

भोपळा आणि बदामाचं तेल 

एक चमचा भोपळ्याची पेस्ट आणि अर्धा चमचा बदामाचं तेल एकत्र करा. 10 मिनिटं लावल्यानंतर धुवून टाका. त्यामुळे त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होईल. 

हेयर मास्क 

सर्वात आधी 2 चमचे भोपळ्याचा गर, 2 चमचे दही, एक चमचा नारळाचं तेल आणि एक चमचा मध एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावा आणि प्लास्टिकने संपू्र्ण केस कव्हर करा. 15 मिनिटांसाठी ठेवा, त्यानंतर शॅम्पूने धुवून टाका. 

Web Title: Beauty secrets of pumpkin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.