Beauty: If you want new hair on the head, then use this oil for use! | Beauty : डोक्यावर नवे केस हवे असल्यास या तेलाचा असा करा वापर !

शरीरातील हार्मोनल बदल तसेच इतर कारणाने बहुतांश लोकांना केस गळतीची समस्या आहे. या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी बरेच प्रयत्नदेखील केले जातात. त्यात केमिकल्स उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याचा फायदाऐवजी नुकसानच जास्त होताना दिसते. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार तेल बनविल्यास आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास नक्की फायदा होईल. 

* तेल बनविण्यासाठी साहित्य
२-३ ताजे आवळे, ६-७ लसणाच्या पाकळ्या, ३ चमचे एरंडेल तेल, ४ चमचे नारळाचे तेल आणि १ छोटा चिरलेला कांदा, 

* कसे बनविणार तेल ?
एका बाऊलमध्ये नारळ आणि एरंडेल तेल एकत्र घेऊन मिश्रण तयार करा. या मिश्रणात लसणाच्या पाकळ्या, कांदा आणि आवळा मिसळून मंद आचेवर ५ मिनिटांसाठी ठेवा. 
थंड झाल्यानंतर हे तेल वापरु शकता. या तेलाचा नियमित वापर केल्यास केसांचा गळणे कमी होईल तसेच नवे केस उगवण्यास सुरुवात होईल.  

Also Read : ​HEALTH TIPS : केस गळतीची समस्या आहे, तर रोज ‘हे’ खा !
                    ​​OMG : डोक्याला टक्कल पडलीय, करा १० घरगुती उपाय !

Web Title: Beauty: If you want new hair on the head, then use this oil for use!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.