Beauty: If not taken care of while doing makeup ...! | Beauty : मेकअप करताना काळजी घेतली नाही तर...!

प्रत्येक महिलेला वाटते आपण सर्वात सुंदर दिसावे. यासाठी त्या मेकअप करण्यावर भर देतात. पण मेकअप कसाही करुन चालत नाही तर तो परफेक्टच करणे आवश्यक आहे. यावेळी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. कारण लहानशी चूकही तुमचा संपूर्ण लूक खराब करू शकते.

सर्वप्रथम कपाळ, गाल, डोळे, नाक, हनुवटी आणि मानेवर क्लिझिंग क्रीमने संपूर्ण चेहरा मसाज केल्यासारखा हात फिरवा. यानंतर ओल्या कापसाने ही क्रीम व्यवस्थित काढून घ्या. अशा पद्धतीने चेहरा स्वच्छ करून घ्या. यानंतर स्कीन फ्रेशनरने चेहरा पुन्हा स्वच्छ करावा. कोरडी त्वचा असेल, तर कापसाने चेहऱ्यावर मॉईश्चराजर लावावे. त्वचेच्या प्रकारानुसार (तेलकट, कोरडी, नॉर्मल) व रंगानुसार फाउंडेशनची निवड करावी. दिवसा मेकअप करताना तो कधीच खूप डार्क करू नये. नेहमी लाईट किंवा माध्यम स्वरुपाचा करावा. काजळाचा उपयोग गरजेचा आहे, पण मस्कारा वापरण्याची आवश्यकता नाही. दिवसाच्या मेकअपसाठी आयशॅडोचा रंग तुमच्या डोळ्याच्या रंगाशी मिळताजुळता किंवा एक शेड लाईट अशीच हवी. यावेळी गडद रंगाचे आयशॅडो वापरू नका तर न्युट्रल कलर वापरा. रात्री मेकअप काढूनच झोपा. यासाठी फक्त पाण्याचा उपयोग करू नका. तर मेकअप काढण्यासाठी क्लिंझरचा अवश्य वापर करा. 

अनेक जणींना लिपस्टीक लावायची सवय असते. प्रसंगी लिपस्टिक लावणाऱ्यांनी या काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. जाड ओठ असणाऱ्यांनी लिप लायनरच्या मदतीने बारीक, अरूंद आउटलाईन काढून घ्यावी. अन्यथा ओठ खूप जाड दिसतात. लांब ओठ असलेल्यांनी जाडसर आउटलाईन काढावी. याचप्रमाणे आउटलाईन काढताना योग्य काळजी घ्यावी. शक्य असल्यास आउटलाईनसाठी वापरण्याचा रंग फिका असावा. प्रसंगाला साजेसा रंग निवडावा. तसेच तो रंग तुमच्या कपड्यांवर शोभून दिसायला हवा. जर गडद रंगाचे लिपस्टिक असेल तर हलक्या रंगाचे लाईनर असावे. आजकाल अनेक जणी क्रीम बेस लिपस्टिक लावणे पसंत करतात. हे सुंदर व ट्रेंडी दिसते. दीर्घकाळ फ्रेश दिसते. लिपस्टिक विविध रंगात उपलब्ध असतात. परंतु ते वापरताना अधिक सतर्क राहणे आवश्यक असते. जर लिपस्टिक तुमच्या ओठांची ठेवण व त्वचेच्या रंगाला शोभत नसेल तर ते विचित्र दिसते. तोच रंग वापरण्याऐवजी नियमितपणे रंग बदलवा. लिपस्टिक लावल्यानंतर एक मिनिटाने ओठांना आईसक्रीम लावा. असे केल्याने लिपस्टीक जास्त काळ टिकून राहील.
Web Title: Beauty: If not taken care of while doing makeup ...!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.