स्काल्पच्या सर्व समस्यांपासून होइल सुटका; ब्राउन शुगर स्क्रब करेल मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 03:44 PM2019-03-08T15:44:01+5:302019-03-08T15:46:53+5:30

स्काल्प म्हणजेच डोक्याची त्वचा हेल्दी नसेल तर केस गळण्यास सुरुवात होते. फक्त एवढचं नाही तर स्काल्पला खाज येणं, जळजळ होणं यांसारख्या समस्या होऊ लागतात. अनेकदा शॅम्पू किंवा कंडिशनरच्या वापराने स्काल्प अनहेल्दी, कोरडे आणि रूक्ष दिसू लागतात. v

All the problems of scalp will get rid of when to apply brown sugar scrub | स्काल्पच्या सर्व समस्यांपासून होइल सुटका; ब्राउन शुगर स्क्रब करेल मदत!

स्काल्पच्या सर्व समस्यांपासून होइल सुटका; ब्राउन शुगर स्क्रब करेल मदत!

Next

(Image Credit : Cook. Craft. Love.)

स्काल्प म्हणजेच डोक्याची त्वचा हेल्दी नसेल तर केस गळण्यास सुरुवात होते. फक्त एवढचं नाही तर स्काल्पला खाज येणं, जळजळ होणं यांसारख्या समस्या होऊ लागतात. अनेकदा शॅम्पू किंवा कंडिशनरच्या वापराने स्काल्प अनहेल्दी, कोरडे आणि रूक्ष दिसू लागतात. स्वस्थ आणि हेल्दी स्काल्पसाठी तुम्ही ब्राउन शुगरचा वापर करू शकता. ब्राउन शुगर स्क्रब केस आणि स्काल्पच्या समस्या कमी करण्यासाठी मदत करतं. स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन उत्तम करण्यासाठीही मदत करतं. स्काल्प हायड्रेट करून त्यांचा रूक्षपणा कमी करतात. तसेच यामुळे खाज आणि जळजळ दूर होण्यास मदत होते. 

अस तयार करा ब्राउन शुगर स्क्रब :

दलिया आणि ब्राउन शुगर स्क्रब :

2 चमचे ब्राउन शुगरमध्ये 2 चमचे दलिया एकत्र करा. यामध्ये 2 चमचे कंडिशनर एकत्र करा. आता त्यामध्ये 15 थेबं ऑलिव्ह ऑइल एकत्र करा. तयार मिश्रण स्काल्पवर लावून 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवून टाका.

बेकिंग सोडा आणि ब्राउन शुगर स्क्रब :

1 चमचा ब्राउन शुगर , 1 चमचा शॅम्पू, 1 चमचा बेकिंग सोड्यामध्ये 3 थएंब टी-ट्री ऑइल एकत्र करा. आता तयार मिश्रम केस आणि स्काल्पला लावून 20 ते 25 मिनिटांसाठी सोडून द्या. त्यानंतर माइल्ड शॅम्पूने केस स्वच्छ करा. 

जोजोबा ऑइल आणि ब्राउन शुगर स्क्रब :

2 चमचे ब्राउन शुगर,  2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे जोजोबा ऑइल आणि 1 चमचा मीठा एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट केसांवर आणि स्काल्पवर लावून 30 मिनिटांपर्यंत तसंच ठेवा आणि त्यानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवून टाका. 

ब्राउन शुगर स्क्रबचे फायदे :

- स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होण्यासाठी हे एका नैसर्गिक एक्सफोलिएटरप्रमाणे काम करतं.

- ब्राउन शुगर स्क्रब स्काल्पच्या त्वचेचा पीएच लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं. 

- ब्राउन शुगर स्काल्पचे टॉक्सिंस फ्लश करतात आणि मुलायम करण्यासाठी मदत करतात. 

- हे केस आणि स्काल्पवर असलेले बॅक्टेरिया आणि किटाणु नष्ट करतात. 

- स्काल्पला सतत खाज येत असेल किंवा जळजळ होत असेल तर त्यासोबतच केसांमधील कोंड्याची समस्याही दूर होते. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: All the problems of scalp will get rid of when to apply brown sugar scrub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.