Alert: Everyday makeupers can become 'this' problem! | ​Alert : रोज मेकअप करणाऱ्यांना होऊ शकतात ‘या’ समस्या !

सध्या सर्वच मुली अभिनेत्रींसारखे आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी रोजच मेकअप करतात. मात्र रोज मेकअप केल्याने नुकसानदेखील होऊ शकते, हे आपणास कदाचित माहित नसेल. चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी मुली रोज ब्यूटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. मेकअप केल्याने आपले सौंदर्य तर खुलतेच. मात्र एका विशेष प्रसंगी मेकअप करणे ठिक आहे, मात्र मुली जर रोजच मेकअप करत असतील तर त्यांनी वेळीच सावध व्हायला हवे. कारण दररोज मेकअप केल्याने त्वचेची प्राकृतिक चमक कमी होते. याव्यतिरिक्त त्वचेचे अन्य नुकसानही होते. जाणून घेऊया रोज मेकअप केल्याने काय नुकसान होते. 

* त्वचेच्या प्रकारात बदल 
मेकअप केल्याने त्वचेचे छिद्रे बंद होतात. त्यामुळे घाम येत नाही. रोज मेकअप केल्याने आणि घाम न आल्याने त्वचेचा प्रकार अचानक बदलू शकतो. भविष्यात ही समस्या मोठी होऊ नये म्हणून रोज मेकअप करणे टाळावे.   
 
* संक्रमणाचा धोका 
रोज मेकअप केल्याने चेहऱ्यावरील छिद्रे बंद होतात त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त बऱ्याचदा चेहऱ्यावर पिंपल्सदेखील येतात.   

* डोळ्यात जळजळ 
महिलांद्वारे चेहऱ्याबरोबरच डोळ्यांचेही मेकअप केले जाते. रोज डोळ्यांचे मेकअप केल्याने डोळे लवकर ड्राय होतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, खाज आणि जडपणा आदी समस्या निर्माण होऊ शकतात. अशा समस्यांपासून बचावासाठी रोज मेकअप करणे टाळावे.  

* अ‍ॅलर्जी 
रोज मेकअप केल्याने बऱ्याचप्रकारची अ‍ॅलर्जीदेखील होऊ शकते. ज्यामुळे चेहरा लालदेखील होऊ शकतो. यापासून बचावासाठी रोज मेकअप करणे टाळावे.  

* पापण्यांचे नुकसान 
बऱ्याच मुली रोज काजळचा वापर करतात. काजळचा रोज वापर केल्यास पापण्यांना नुकसान पोहचू शकते. यासाठी रोज काजळचा वापर टाळावा.    

* सुरकुत्या येणे 
बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये केमिकल्स असतात. मेकअपसाठी रोजच या केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्यास चेहऱ्याच्या त्वचेची पोत खराब होते, शिवाय या प्रसाधनांमुळे चेहऱ्याचे आॅइल शोषले जात असल्याने त्वचा कोरडी होते त्यामुळे सुरकुत्या येण्यास सुरुवात होते.  
Web Title: Alert: Everyday makeupers can become 'this' problem!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.