ब्युटी प्रॉब्लेम्सवर वरदान ठरतं चारकोल; जाणून घ्या फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 02:49 PM2018-11-16T14:49:47+5:302018-11-16T14:50:50+5:30

आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु दररोजची धावपळ, थकवा, ताण आणि प्रदुषण यांमुळे त्वचेची सुंदरता नष्ट होते. ज्यामुळे त्वचेवर पिंम्पल्स, डाग, सुरकुत्या आणि निस्तेजपणा येतो.

activated charcoal is beneficial for beautiful skin | ब्युटी प्रॉब्लेम्सवर वरदान ठरतं चारकोल; जाणून घ्या फायदे!

ब्युटी प्रॉब्लेम्सवर वरदान ठरतं चारकोल; जाणून घ्या फायदे!

googlenewsNext

आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु दररोजची धावपळ, थकवा, ताण आणि प्रदुषण यांमुळे त्वचेची सुंदरता नष्ट होते. ज्यामुळे त्वचेवर पिंम्पल्स, डाग, सुरकुत्या आणि निस्तेजपणा येतो. अशातच त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अनेकदा पार्लरमध्ये जाऊन ट्रिटमेंटही करण्यात येतात. या सर्व समस्यांपासून सुटका करण्यासाठी अॅक्टिवेटेड चारकोलचा वापर करणं फायदेशीर ठरतं. चारकोल म्हणजेच कोळशाचाच एक प्रकार आहे. जाणून घेऊयात त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी अॅक्टिवेटेड चारकोलचा वापर करण्याबाबत...

चारकोल आणि अॅक्टिवेटेड चारकोलमध्ये काय फरक आहे?

चारकोल प्युअर कार्बनचं एक रूप आहे. लाकूड जाळून हे चारकोल तयार करण्यात येतं. हे तयार करण्यासाठी 800 ते 1200 डिग्री तापमानावर लाकडाला कमी ऑक्सिजनमध्ये जाळण्यात येतं. त्यानंतर या तयार चारकोलला अॅक्टिवेट करण्यासाठी जास्त तापमानामध्ये स्टिम करण्यात येतं. या प्रक्रियेमध्ये असलेल्या अकार्बनिक पदार्थांना बाहेर काढून टाकण्यात येतं. चारकोलपेक्षा अॅक्टिवेटेड चारकोल त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. 

का फायदेशीर आहे अॅक्टिवेटेड चारकोल?

अॅक्टिवेटेड चारकोल त्वचेची खोलवर जाऊन घाण आणि टॉक्सिन्स स्वच्छ करण्याचं काम करतात. त्वचेला स्वच्छ करण्यासोबतच पोषण देण्यासाठीही उपयोगी ठरतं. ज्यामुळे त्वचेच्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. तुम्ही शक्य असल्यास यामध्ये मध, ऑलिव्ह ऑइल, शिया बटर आणि खोबऱ्याचं तेल देखील वापरू शकता. 

अॅक्टिवेटेड चारकोलचे फायदे :

त्वचेचे आजार दूर करण्यासाठी चारकोल 

सौंदर्य वाढविण्यासोबतच त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही अॅक्टिवेटेड चारकोल उपयुक्त ठरते. एक्जिमा आणि सोरायसिसपासून सुटका करण्यासाठी हे फायदेशीर ठरतं. परंतु याचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. 

दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी 

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी चारकोल फायदेशीर ठरतं. टूथपेस्टमध्ये अॅक्टिवेटेड चारकोल एकत्र करून वापरा. यामुळे काही दिवसांतच दातांवरचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी 

रात्री 2 ते 3 अॅक्टिवेटेड चारकोल कॅप्सूल घेऊन व्यवस्थित बारिक करून घ्या. त्यानंतर यामध्ये 1/4 चमचे जेलेटिन, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल एकत्र करून  मास्क तयार करा. त्यानंतर ही पेस्ट ब्लॅकहेड्स असलेल्या जागांवर लावा आणि सुकल्यानंतर हळूहळू पील करा. यामुळे चेहऱ्यावरील सर्व ब्लॅकहेड्स नाहीसे होतील. 

पिंपल्ससाठी चारकोल फेस पॅक 

चारकोल पावडर, 2 ते 3 चमचे कोरफडीचा गर आणि 2 ते 3 थेंब टी-ट्री ऑइल एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहऱ्या धुवून घ्या. या फेस पॅकचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होईल. 

ओपन पोर्स बंद करण्यासाठी 

ओपन पोर्स बंद करण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ करण्यासाठी चारकोल कॅप्सुलमध्ये गुलाबपाणी मिक्स करून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि चेहरा धुवून टाका. 

ऑयली स्किनसाठी 

त्वचेवरील ऑइल लेव्हल बॅलेन्स करण्यासाठी चारकोल पावडरमध्ये खोबऱ्याचे तेल, मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. 

केसांसाठी फायदेशीर 

चारकोल त्वचेच्या रंग उजळवण्यासाठी मदत करतो. परंतु याचा वापर केल्याने केसांतील कोंडा, स्काल्पवरील इन्फेक्शन यांसारख्या समस्या दूर होतात. 

Web Title: activated charcoal is beneficial for beautiful skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.