'या' कारणांमुळे तुमचे केस होतात पातळ आणि कमजोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 11:05 AM2019-03-26T11:05:58+5:302019-03-26T11:07:34+5:30

केसांबाबतच्या समस्यांचा सामना सर्वात जास्त महिलांना करावा लागतो. प्रत्येकालाच दाट, सुंदर, मजबूत केस हवे असतात पण काही चुकांमुळे केस कमजोर आणि पांढरे होऊ लागतात.

6 reasons of thin brittle dull and dry hair | 'या' कारणांमुळे तुमचे केस होतात पातळ आणि कमजोर

'या' कारणांमुळे तुमचे केस होतात पातळ आणि कमजोर

Next

(Image Credit : SafeandHealthylife)

केसांबाबतच्या समस्यांचा सामना सर्वात जास्त महिलांना करावा लागतो. प्रत्येकालाच दाट, सुंदर, मजबूत केस हवे असतात पण काही चुकांमुळे केस कमजोर आणि पांढरे होऊ लागतात. यावर वेगवेगळे उपाय केले जातात. पण या उपायांचा काही फायदा होतोच असे नाही. 

बदलत्या जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुले केस कमजोर होऊ लागतात. आहारातून आवश्यक पोषत तत्व मिळत नसल्याने केसांची समस्या होते. तसेच लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. केसांची समस्या दूर करायची असेल तर त्याआधी केस खराब होण्याची कारणे जाणून घेतली पाहिजे. 

केसांना तेल लावण्याची पद्धत

केसांना तेल लावणे फायदेशीर असतं. पण चुकीच्या पद्धतीने आणि जास्त प्रमाणात तेल लावल्याने केस कमजोर होऊ लागतात. केसांना जास्त प्रमाणात तेल लावल्याने केसांची योग्य पद्धतीने स्वच्छता होऊ शकत नाही आणि त्यामुळे केसांच्या मुळात पुरेशी हवा पोहोचत नाही. अशात केस कमजोर होऊ लागतात. केस जर मजबूत ठेवायचे असतील तर आठवड्यातून २ पेक्षा अधिक वेळा तेल लावू नये. 

केसांची स्वच्छता

केसांचं सर्वात जास्त नुकसान धूळ-माती यामुळे होतं. केसांबाबत जे लोक सजग असतात ते योग्यप्रकारे केसांची स्वच्छता करतात. पण काही लोक हे केवळ शॅम्पू करणेच केसांची स्वच्छता मानतात. वास्तविक पाहता केसांना शॅम्पू करण्यासोबतच योग्य पद्धतीने केस करणेही महत्त्वाचं असतं. कंगव्याच्या माध्यमातून केसांच्या मुळात असलेली धूळ-माती स्वच्छ केली जाते. 

केसांमध्ये केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर

केसांना सर्वात जास्त कमजोर जर काही करत असेल तर ते आहे केमिकल प्रॉडक्ट्स. अलिकडे केसांना वेगवेगळे लूक देण्यासाठी हेअर स्प्रे, जेलचा वापर केला जातो. याने केसांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे केमिकलमुळे केस कमजोर होतात. 

हेअर ब्लीचिंग आणि हेअर कलर

स्टाइल आणि लूकसाठी लोक केसांना वेगवेगळे कलर लावतात. कलर व्यतिरीक्त ब्लीचिंगचा वापरही लोक केसांवर करू लागले आहेत. केसांमध्ये पुन्हा पुन्हा ब्लीचिंग केल्याने केसांची नैसर्गिक चमक दूर होते आणि केस निर्जिव-रखरखीत होतात. केसा कमजोर होण्यापासून वाचवायचे असतील तर हेअर कलर आणि ब्लीचिंग टाळलं पाहिजे. 

भिजलेल्या केसात कंगवा फिरवणे

काही लोकांना सवय असते की, ते भिजलेल्या केसांमध्ये कंगवा फिरवतात. पण हे चूक आहे. कारण असे केल्याने केसांच्या मुळाचं नुकसान होतं. केस तुटू लागतात. तसेच भिजलेल्या केसांमध्ये कंगवा फिरवल्याने केस पातळ होऊ लागतात. 

हेअर ड्रायरचा अधिक वापर

रोज केस सुकवण्यासाठी तुम्ही जर हेअर ड्रायरचा वापर करत असाल तर तुम्हीच तुमच्या केसांचं नुकसान करताय. हेअर ड्रायरचा वापर कमी करायला हवा. 

Web Title: 6 reasons of thin brittle dull and dry hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.