रक्तातील टॉक्सिनमुळे होतात त्वचा रोग, या पदार्थांनी रक्त करा शुद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 10:14 AM2018-09-25T10:14:04+5:302018-09-25T10:14:20+5:30

रक्ताची आपल्या शरीरात महत्त्वपूर्ण भूमिका असते. रक्त शरीरातील अंगांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम करतं आणि शरीराचं तापमान कंट्रोल करतं.

5 skin problems when blood is toxic and foods to detoxify it | रक्तातील टॉक्सिनमुळे होतात त्वचा रोग, या पदार्थांनी रक्त करा शुद्ध!

रक्तातील टॉक्सिनमुळे होतात त्वचा रोग, या पदार्थांनी रक्त करा शुद्ध!

googlenewsNext

रक्ताची आपल्या शरीरात महत्त्वपूर्ण भूमिका असते. रक्त शरीरातील अंगांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम करतं आणि शरीराचं तापमान कंट्रोल करतं. चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे आपल्या रक्तात काही असे तत्व पोहोचतात ज्याने शरीराला नुकसान होतं. शरीर फिट ठेवण्यासाठी आणि आजारांना दूर ठेवण्यासाठी शरीरातील टॉक्सीन बाहेर निघणं गरजेचं आहे. आपल्या शरीरात हवा, पाणी आणि पदार्थांमधील प्रदुषणामुळे टॉक्सीन जमा होतं, हे विषाप्रमाणे असतं. रक्त शुद्ध नसलं तर फुऱ्या, पिंपल्स आणि त्वचा रोग होतात. त्यामुळे टॉक्सीन बाहेर काढण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर ठरतात हे आपण पाहुया....

टॉक्सिनमुळे 'या' रोगांचा होतो धोका

सामान्यपणे तुमचं लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर करुन योग्य स्थितीत रहायला हवं. पण शरीरात खूप जास्त प्रमाणात टॉक्सिन जमा होतं तेव्हा लिव्हरवर अधिक प्रेशर येतं. त्यामुळे त्वचा अतिरीक्त विषारी पदार्थ दूर करण्याच्या प्रयत्न करु लागतात. याकारणाने त्वचासंबंधी ५ आजार होऊ शकतात. 

- चेहरा आणि शरीरावर पिंपल्सची समस्या

- त्वचेवर लाल चट्टे येणे

- नसांमध्ये निळेपणा दिसणे आणि त्वचा निळी पडणे

- त्वचेवर खाज येण्यासोबत गोल-पांढरे चट्टे येणे

- त्वचा आणि नखांजवळ मास निघणे

हे पदार्थ रक्त शुद्ध करतात

जर तुम्हाला शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर काढायचं असेल तर, आहारात काही बदल करणे फायद्याचे ठरेल. रक्तामध्ये असलेली घाण स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला डिटॉक्सिफिकेशन असे म्हटले जाते. 

जेवणाआधी सलाद

जेवण सुरु करण्याआधी अधिक प्रमाणात ग्रीन सलाद किंवा रंगीबेरंगी भाज्यांचा मिक्स सलाद खावा. सलादमध्ये अॅंटीऑक्सिडेंट्स आणि एंजाइम्स भरपूर असतात, जे आपल्या पचनक्रियेला योग्य ठेवतात. सोबतच तुम्हाला गरज असलेले व्हिटॅमिन्स, मिनरल, क्लोरफिल आणि इतरही फिटोकेमिकल्स देतात. त्यामुळे जेवण करण्याआधी कमीत कमी एक वाटी ग्रीन सलाद नक्की खावा. 

सर्वात महत्त्वाचं पाणी

जर शरीरातील घाण किंवा विषारी पदार्थ तुम्हाला बाहेर काढायचे अशल तर यावरील सर्वात चांगला उपाय म्हणजे पाणी आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित नसाल तर तुम्ही कितीही हेल्दी आहार घेतला तरी तुम्हाला काही फायदा होणार नाही. तुमच्या शरीरातील घाण साफ होणार नाही. त्यामुळे शरीर डिटॉक्स करण्यासाठी दिवसातून कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. 

लिंबू आणि संत्री

अॅंटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेली संत्री आणि लिंबू लिव्हरचं कार्य योग्य प्रकारे होण्यास मदत करतं. काही दिवस चांगल्या आहारासोबतच लिंबू पाणी प्यायल्याने डिटॉक्स प्रणाली चांगली होते. लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी आणि लिमोनोइ़ड्स असतात जे डिटॉक्सीफाय एंजाइम सक्रीय करण्यासाठी मदत करतात. 

फळांचं सेवन गरजेचं

भरपूर प्रमाणात फळं खाल्याने फायदा होतो. फळांमध्ये असलेल्या मिनरल्स आणि अॅंटीऑक्सिटेंड्स तुमचं रक्त शुद्ध करण्यास मदत करतं. तसेच तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी कोलन आणि फिम्फेटिक सिस्टम योग्य प्रकारे काम करण्यास मदत करतं. 

शेंगदाणे आणि कडधान्याचं सेवन

शरीरातील शुगर लेव्हल स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला हेल्दी स्नॅक्स खाणे गरजेचे आहे. शुगरमध्ये होणारा चढ-उतार शारीरिक ऊर्जा कमी करतं. शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यासाठी आणि ऊर्जा वाढण्यासाठी तुम्हाला शेंगदाणे, कडधान्य खाणे फार गरजेचे आहे. 

Web Title: 5 skin problems when blood is toxic and foods to detoxify it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.