डोळे नेहमीच सूजलेले दिसतायत?; 'ही' आहेत 5 कारणं आणि उपचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 11:45 AM2019-07-11T11:45:46+5:302019-07-11T11:50:02+5:30

पफी आइज म्हणजेच, डोळ्यांना आलेली सूज ही महिलांना सतावणारी मोठी समस्या बनली आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या डोळ्यांखालील त्वचा सूजलेली दिसू लागते.

5 reasons and remedies to treat puffy eyes in simple ways | डोळे नेहमीच सूजलेले दिसतायत?; 'ही' आहेत 5 कारणं आणि उपचार!

डोळे नेहमीच सूजलेले दिसतायत?; 'ही' आहेत 5 कारणं आणि उपचार!

Next

पफी आइज म्हणजेच, डोळ्यांना आलेली सूज ही महिलांना सतावणारी मोठी समस्या बनली आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या डोळ्यांखालील त्वचा सूजलेली दिसू लागते. उठल्यानंतर बऱ्याच वेळानंतरही या त्वचेवरील सूज काही केल्या कमी होत नाही. अनेकदा या समस्येमुळे लूक बिघडतो. काही महिला ही समस्या दूर करण्यासाठी मेकअपचा आधार घेतात. जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर सर्वात आधी असं होण्यामागे नक्की काय कारण आहे, हे जाणून घेणं आवश्यक असतं. यामुळेच तुम्ही योग्य उपचार करून ही समस्या दूर करू शकता. 

1. भरपूर झोप घेणं गरजेचं 

झोप पूर्ण न झाल्यामुळेही डोळ्यांखाली सूज येते. एवढचं नव्हे तर अनेकदा सूज येण्यासोबतच डोळ्यांखाली काळी वर्तुळंही दिसून येतात. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही जर अनिद्रेचा किंवा अपूर्ण झोपेच्या समस्येचा सामना करत असाल तर, डोळ्यांखाली आलेली सूज जात नाही. त्यामुळे दररोज शांत आणि पूर्ण झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. एका व्यक्तीने दररोज 6 ते 7 तासांची शांत झोप घेणं आवश्यक असतं. त्यामुळे डोळ्यांखालील त्वचेची सूज कमी होण्यासही मदत होते. 

2. जास्त पाणी पिणं 

शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळेही डोळ्यांखालील त्वचेवर सूज येते. शरीर आतून हायड्रेट राहिल्यानेही त्याच्या पॉझिटिव्ह इम्पॅक्ट स्किनवरही दिसून येतो. सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास नॉर्मल पाणी प्या. तसेच रात्री झोपण्यापूर्वीही पाणी पिणं फायदेशीर ठरतं. 

3. जास्त मिठाचं सेवन करणं टाळावं

मिठाच्या अतिसेवनाने शरीरातील एका खास प्रकारच्या लिक्विड पदार्थाची कमतरता जाणवते. ज्यामुळे डोळ्यांखाली सूज आणि काळई वर्तुळं तयार होतात. ही समस्या दूर करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये मिठाचं प्रमाण सामान्य ठेवणं गरजेचं असतं. मिठाचं अतिसेवन करणं टाळावं. 

4. झोपण्याची पद्धत बदला 

जर तुम्ही फक्त एकाच कुशीवर किंवा पोटावर झोपत असाल तर ट्राय करा की, झोपताना तुमचं डोकं शरीरापेक्षा थोडसं वरच्याबाजूला उचललेलं असेल. तसेच तुमचा चेहरा आणि डोळे रात्रभर कोणत्याही उशांमध्ये किंवा चादरीमध्ये नसावेत. 

5. कोल्ड कॉम्प्रेस 

पफी आइजची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि कोणताही खर्च न करता घरच्या घरी तुम्ही काही उपाय करू शकता. त्यासाठी तुम्ही एक चमचा फ्रिजरमध्ये थंड करत ठेवायचा आहे. जसा हा चमचा थंड होईल, तसा तो फ्रिजमधून काढा आणि त्याच्या मागील बाजूने डोळ्यांवर हलकेच दाब द्या. यामुळे डोळ्यांखालील सूज कमी होण्यास मदत होईल. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: 5 reasons and remedies to treat puffy eyes in simple ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.