काखेतून येणारी दुर्गंधी कमी करण्याचे 5 नैसर्गिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 02:57 PM2018-04-17T14:57:44+5:302018-04-17T15:05:02+5:30

अंडरआर्म्समधून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी हे नक्की वाचा...

5 natural ways get rid underarm Odor | काखेतून येणारी दुर्गंधी कमी करण्याचे 5 नैसर्गिक उपाय

काखेतून येणारी दुर्गंधी कमी करण्याचे 5 नैसर्गिक उपाय

Next

मुंबई - प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेवर चट्टे-व्रण उठणे, अशा त्वचाविकारांना आपल्याला सामोरे जावे लागते. उन्हामुळे प्रमाणाबाहेर येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीमुळेही, विशेषतः काखेमधून येणा-या दुर्गंधीमुळे प्रचंड समस्या निर्माण होतात. यावर कितीही डीओ, परफ्यूमचा वापर केला तरीही काही वेळानंतर दुर्गंधी पुन्हा येते. शिवाय, वारंवार डीओ, परफ्यूमचा वापर करणंदेखील शक्य नसते. अशातच जर नैसर्गिंक पद्धतींचा वापर केल्यास काखेतून येणारी दुर्गंध कमी केली जाऊ शकते.

अंडरआर्म्समधून येणारा दुर्गंध कमी करण्यासाठी उपाय  

1. व्हिनेगर :  
कापसाच्या बोळ्याच्या सहाय्यानं व्हिनेगर काखेत लावावे. सकाळ व संध्याकाळी हा प्रयोग केल्यास काखेतून येणारा दुर्गंध कमी होण्यास मदत होते. व्हिनेगरमध्ये मायक्रो-बॅक्टेरिअल तत्व असतात, यामुळे नैसर्गिक सुंगध मिळतो.

2. लॅव्हेंडर ऑइल: 
एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लॅव्हेडर ऑइलचे काही थेंब मिसळावेत.  या स्प्रेचा वापर डीओप्रमाणे दररोज करावा. काखेवर स्प्रे केल्यानंतर घाम आल्यास त्याचा दुर्गंध येणार नाही. लॅव्हेंडर ऑइलमध्ये निसर्गतःच एक सुंगध असून तो दुर्गंध कमी करण्याचे काम उत्तम प्रकारे करतो.

3. नारळाचे तेल :
आंघोळ केल्यानंतर बोटांवर थोडेसे नारळाचे तेल घ्यावे आणि काखेवर लावावे. त्वचा नारळाचे तेल शोषून घेते. दिवसातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग केला जाऊ शकतो. मात्र, तेल लावण्यापूर्वी आंघोळ तरी करावी किंवा काख स्वच्छ करुन घ्यावेत. नारळाचे तेल काखेत तयार होणाऱ्या जीवाणूंना नष्ट करण्याचं काम करते.

4. बटाटा : 
बटाट्याचे काप करुन काखेवर चोळावेत. काही वेळानंतर त्यावर डीओ स्प्रे करावा. दिवसातून एक किंवा दोन वेळा या प्रयोग केल्यास दुर्गंधी येणार नाही. बटाट्यामध्ये काखेची पीएच लेव्हल नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म आहेत. 

5. कोरफड :
बोटांवर कोरफडीचा थोडासा गर घेऊन काखेवर चोळावा आणि संपूर्ण रात्र तसाच ठेऊन द्यावा. कोरफडीचा गर नैसर्गिक पद्धतीनं काखेचं आरोग्य सुधारते. काखेतून येणारी दुर्गंधी कमी होते शिवाय टॅनिंगची (काळेपणा) समस्यादेखील कमी होण्यास मदत होते.

Web Title: 5 natural ways get rid underarm Odor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.