Youth Olympics 2018:India shuttler Lakshya Sen reaches men's singles final | Youth Olympics 2018: लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक, भारताचे आणखी एक पदक निश्चित
Youth Olympics 2018: लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक, भारताचे आणखी एक पदक निश्चित

ब्युनोस आयरिस : भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने पिछाडीवरून मुसंडी मारताना जपानच्या कोडाई नाराओकाला पराभूत केले. 

लक्ष्यने पहिला गेम 14-21 असा गमावला, परंतु त्याने पुढील गेममध्ये 21-15 असा विजय मिळवून सामना निर्णायक गेममध्ये नेला. निर्णयाक गेममध्ये दोन्ही खेळाडूंकडून चुरशीचा खेळ झाला. मात्र लक्ष्यने 24-22 अशी बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला. 
 जेतेपदासाठी त्याला चीनच्या ली शिफेंगचा सामना करावा लागणार आहे. अंतिम सामन्यात लक्ष्यने विजय मिळवल्यास तो युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला बॅडमिंटनपटू ठरेल. 2010 च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत प्रणॉय कुमारने रौप्यपदक जिंकले होते.  


Web Title: Youth Olympics 2018:India shuttler Lakshya Sen reaches men's singles final
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.