जागतिक शालेय बॅडमिंटन : भारताच्या मुलींची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 02:08 AM2018-04-21T02:08:25+5:302018-04-21T02:08:25+5:30

महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघाच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या गटात भारत ‘अ’ संघाने शुक्रवारी ब्राझीलवर मात करून विजयी सलामी दिली.

 World School Badminton: India's girls' winning streak | जागतिक शालेय बॅडमिंटन : भारताच्या मुलींची विजयी सलामी

जागतिक शालेय बॅडमिंटन : भारताच्या मुलींची विजयी सलामी

Next

पुणे : महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघाच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या गटात भारत ‘अ’ संघाने शुक्रवारी ब्राझीलवर मात करून विजयी सलामी दिली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या गट-२ मध्ये भारत ‘अ’ संघाने ब्राझीलवर ५-०ने मात केली. यातील दुहेरीच्या पहिल्या लढतीत निकिता संजय-अंजना कुमारी जोडीने मारिया रोचा-लोरेना व्हिएरा जोडीवर १९-२१, २१-१९, २१-१७ असा विजय मिळवला. यानंतर शिवप्रिया-चिमरन कलिता जोडीने माद्रदो-ग्लेयसी मौरा जोडीवर २१-७, २१-१२ अशी मात केली. एकेरीत निकिताने मारियावर २१-१४, २१-१० असा, प्रेरणा अल्वेकरने सिझिअने फेरोवर २१-६, २१-८ असा, तर कलिताने लोरेनावर २१-१३, २१-१३ असा विजय मिळवला. शालेय गटातील मुलींच्या गट-१मध्ये चीनने भारत ‘अ’ संघावर ५-० ने मात केली.

मुलांमध्ये भारताच्या ‘अ’ संघाची ‘ब’ संघावर मात
मुलांच्या गटात भारत ‘अ’ संघाने भारत ‘ब’ संघावर ५-०ने मात केली. यात दुहेरीत रितूपर्णा बोरा-त्रिखा वरुण जोडीने आर्यमन-अनिश जोडीवर २१-१६, ८-२१, २१-१६ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. यानंतर मन्नेपल्ली तरुण-पारस माथूर जोडीने गौतम - अर्जुन जोडीवर २१-१८, २१-१८ अशी मात केली. यानंतर एकेरीत मोनिमुग्धाने अनिरुद्धसिंगचे आव्हान २१-१५, १४-२१, २१-१२ असे परतवून लावले. यानंतर तरुणने अर्जुनवर २१-१६, १८-२१, २१-१० अशी, तर पारसने गौतमवर २१-१९, २१-१८ अशी मात केली.

शालेय गटात पराभवाने सुरुवात
शालेय गटातील मुलींच्या गट-१मध्ये चीनने भारत ‘अ’ संघावर ५-०ने मात केली. यातील एकाही लढतीत भारतीय मुलींना चीनच्या मुलींसमोर आव्हान निर्माण करता आले नाही. यातील पाचही लढती एकतर्फीच झाल्या. मुलांच्या गट-१मध्ये चीनने भारत ‘ब’ संघावर ५-०ने सहज मात केली. मुलांच्या गट-२मध्ये इंग्लंडने भारत अ संघाचा ५-०ने धुव्वा उडविला.

Web Title:  World School Badminton: India's girls' winning streak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton