अव्वल स्थान पटकावयाचे आहे- पी. व्ही. सिंधू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:22 AM2017-12-29T00:22:54+5:302017-12-29T00:23:22+5:30

नवी दिल्ली : आॅलिम्पिक रौप्यपदक प्राप्त पी.व्ही. सिंधू हिचे लक्ष हे आगामी हंगामात जगातील नंबर वन खेळाडूच्या स्थानावर लागून राहिले आहे

The top position is to be won- p. V. Indus | अव्वल स्थान पटकावयाचे आहे- पी. व्ही. सिंधू

अव्वल स्थान पटकावयाचे आहे- पी. व्ही. सिंधू

Next

नवी दिल्ली : आॅलिम्पिक रौप्यपदक प्राप्त पी.व्ही. सिंधू हिचे लक्ष हे आगामी हंगामात जगातील नंबर वन खेळाडूच्या स्थानावर लागून राहिले आहे; परंतु आपण रँकिंगविषयी चिंतीत नाही. कारण सातत्यपूर्वक कामगिरीने अव्वल स्थान प्राप्त करू, असे तिने म्हटले आहे.
सिंधूने नुकत्याच झालेल्या हंगामात जवळपास दोन महिने कारकीर्दीतील सर्वोत्तम असे दुसºया क्रमांकाचे रँकिंग प्राप्त केले होते.
पीबीएलमध्ये बुधवारी रात्री चेन्नई स्मॅशर्सला मुंबई राकेटस्वर ४-३ असा विजय मिळवून देणारी सिंधू म्हणाली, ‘मी आगामी हंगामात स्वत:ला जगातील नंबर वन खेळाडूच्या रूपात पाहू इच्छिते. मी सध्या तिसºया स्थानावर आहे आणि हे स्पर्धेवर अवलंबून असेल. चांगले खेळल्यास तुम्हाला आपोआप रँकिंग मिळेल. त्यामुळे मी रँकिंगविषयी जास्त विचार करीत नाही.’ ‘मला फक्त चांगले खेळावे लागेल आणि मी स्वत:च तेथे पोहोचेल हे मला माहीत आहे.’ नोजोमी ओकुहाराविरुद्ध विश्व चॅम्पियनशिप फायनलनंतर महिला एकेरीचे सामने प्रदीर्घ वेळेत होत आहेत,’ असेही सिंधूने सांगितले.

Web Title: The top position is to be won- p. V. Indus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.