सिंगापूर ओपन बॅडमिंटन, गतविजेता प्रणीत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:18 AM2018-07-19T03:18:06+5:302018-07-19T03:18:19+5:30

भारताचा गतविजेता बी. साई प्रणीतला पुरुष एकेरीत जपानच्या यू इगाराशीकडून पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

Singapore Open Badminton, defending champion Praneeth | सिंगापूर ओपन बॅडमिंटन, गतविजेता प्रणीत पराभूत

सिंगापूर ओपन बॅडमिंटन, गतविजेता प्रणीत पराभूत

Next

सिंगापूर : भारताचा गतविजेता बी. साई प्रणीतला पुरुष एकेरीत जपानच्या यू इगाराशीकडून पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. दुसरीकडे भारताचे शुभंकर डे, आणि ऋत्विका शिवानी गाडे व रितूपर्णा दास यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला.
सहाव्या मानांकीत प्रणीतला १ तास ११ मिनिटे झालेल्या लढतीत इगाराशीने २१-१६, १६-२१, १८-२१ गुणांनी नमविले. शुभंकर डेने कॅनडाच्या जासन एॅथनी होशुएला १४-२१, २१-१४, २१-१६ तर महिलांच्या एकेरीत ऋत्विका शिवानी गाडेने बल्गेरीयाच्या लिंडा जेचिराला २१-१५, १७-२१, २१-१६ गुणांनी पराभत करून दुसऱ्या फेरीतील आपली जागा निश्चित केली. दुसरीकडे भारताची रितूपर्णा दास स्वित्झर्लंडच्या सबरीना जॉकेटविरुद्ध पहिल्या गेममध्ये ३-५ गुणांनी पिछाडीवर असताना सबरीनाने दुखापतीमुळे माघार घेतली.
मिश्र दुहेरीत भारताच्या प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डीने जर्मनीचा जोनास राल्फी जानसेन आणि कारला नेल्टेला २१-१९, १६-२१, २१-१२ गुणांनी नमवित पुढच्या फेरीत प्रवेश केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Singapore Open Badminton, defending champion Praneeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton