सायना, सिंधू, श्रीकांत, समीर, प्रणय दुस-या फेरीत, पुढील फेरीत सायनाची लढत कॅरोलिना मारीनविरुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 03:49 AM2017-09-21T03:49:12+5:302017-09-21T03:49:14+5:30

आठवडाभरानंतर कोर्टवर परतलेले सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत स्थितीत विजय मिळवून जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटनच्या दुस-या फेरीत धडक दिली.

Saina Nehwal, Saina Nehwal, Saina Nehwal, Saina Nehwal, Saina in second round | सायना, सिंधू, श्रीकांत, समीर, प्रणय दुस-या फेरीत, पुढील फेरीत सायनाची लढत कॅरोलिना मारीनविरुद्ध

सायना, सिंधू, श्रीकांत, समीर, प्रणय दुस-या फेरीत, पुढील फेरीत सायनाची लढत कॅरोलिना मारीनविरुद्ध

Next


टोकियो : आठवडाभरानंतर कोर्टवर परतलेले सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत स्थितीत विजय मिळवून जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटनच्या दुस-या फेरीत धडक दिली.
विश्व चॅम्पियनशिपचे कांस्य जिंकणाºया सायनाने जांघेतील मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे कोरिया ओपनमध्ये भाग घेतला नव्हता.
तिने बुधवारी पहिल्या सामन्यात थायलंडची पोर्नपावी चोचुवोंग
हिचा ३९ मिनिटांत २१-१७, २१-९ ने पराभव केला. लंडन आॅलिम्पिकची कांस्यविजेती असलेल्या सायनाला पुढील फेरीत आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारीन हिच्याविरुद्ध खेळावे लागेल.
मारीनविरुद्ध सायनाच्या जय-पराजयांचा रेकॉर्ड ४-३ असा आहे. तथापि, मागच्या चारपैकी ३ सामन्यांत सायनाला मारीनविरुद्ध पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. दुसरीकडे रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी़ व्ही. सिंधूने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करुन जपानच्या मिनात्सु मितानीचा १२-२१, २१-१५, २१-१७ गुणांनी पराभव केला़ इंडोनेशिया आणि आॅस्ट्रेलिया ओपनविजेता श्रीकांत याने जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेला चीनचा टियान होवेई याचा २१-१५, १२-२१, २१-११ अशा फरकाने पराभव केला. आठवा मानांकित श्रीकांतला आता पुढील फेरीत हाँगकाँगचा हू यून याचे आव्हान असेल. उभय खेळाडूंचा परस्परांविरुद्धचा रेकॉर्ड २-२ असा आहे. अमेरिकन ओपन ग्रॅण्डप्रिक्स चॅम्पियन एच. एस. प्रणय आणि सय्यद मोदी ग्रॅण्डप्रिक्सविजेता समीर वर्मा यांनी सरळ विजयाची नोंद करून पुढील फेरी गाठली. प्रणयने डेन्मार्कचा अँडर्स अँटोन्सन याच्यावर २१-१२, २१-१४ ने, तर समीरने थायलंडचा खोसिक फेटप्रदाब याच्यावर ४० मिनिटांत २१-१२, २१-१९ ने विजय नोंदविला.
समीरचा मोठा भाऊ सौरभ वर्मा हा सातवा मानांकित आणि दोन वेळचा आॅलिम्पिक चॅम्पियन चीनचा लिन दान याच्याकडून २१-११, १५-२१, १३-२१ अशा फरकाने पराभूत होताच स्पर्धेबाहेर पडला. सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-अश्विनी पोनप्पा यांनी मिश्र गटात पहिला अडथळा पार केला. या जोडीने थायलंडच्या टिन इसरियानेत-पांचापूर चोचुवोंग यांच्यावर २१-१७, २१-१३ ने विजय नोंदविला. सात्त्विक-चिराग शेट्टी या जोडीला पुरुष दुहेरीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. इंडोनेशियाची जोडी मार्क्सगिडोन-संजया
सुकामुलयो यांच्याकडून त्यांचा २५-२७, १५-२१ असा पराभव झाला. मनू अत्री-बी. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina Nehwal, Saina Nehwal, Saina Nehwal, Saina Nehwal, Saina in second round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.