सायना, कश्यप यांची मोदी बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 01:48 AM2018-11-22T01:48:41+5:302018-11-22T01:49:33+5:30

‘फुलराणी’ सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी सहज विजयासह सय्यद मोदी विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी आश्वासक सुरुवात केली.

 Saina and Kashyap win the Badminton tournament | सायना, कश्यप यांची मोदी बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी

सायना, कश्यप यांची मोदी बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी

Next

लखनौ : ‘फुलराणी’ सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी सहज विजयासह सय्यद मोदी विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी आश्वासक सुरुवात केली. विद्यमान चॅम्पियन प्रणव जेरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांची जोडी मिश्र दुहेरीच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाली.
प्रणव- सिक्की या जोडीला केवळ ३१ मिनिटांत चीनच्या रेन झियांगू- झोऊ चाओमिन यांनी १४-२१,११-२१ पराभूत केले. तीन वेळेची चॅम्पियन सायनाने मॉरिशसच्या केट फू कून हिचा २१-१०, २१-१० असा पराभव केला. कश्यपने थायलंडचा तानोंगसाक सेनसोबुन्स्कला २१-१४, २१-१२ असे नमविले.
सायनाला पुढील फेरीत भारताच्याच अमोलिकासिंग सिसोदिया व कश्यपला इंडोनेशियाचा फरमान अब्दुल खोलिकविरुद्ध खेळावे लागेल. बी साईप्रणित यानेही पहिला अडथळा सहज पार केला. त्याने रशियाचा सर्गेई सिरांतवर २१-१२, २१-१० ने विजय नोंदविला. (वृत्तसंस्था)

Web Title:  Saina and Kashyap win the Badminton tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.