पी.व्ही. सिंधू विजयी पण भारत पराभूत; इंडोनेशियाने ३-१ अशी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 12:17am

लिम्पिक रौप्यपदकप्राप्त बॅडमिंटन तारका पी.व्ही. सिंधू हिच्या विजयानंतरही भारतीय महिला संघ आज येथे बॅडमिंटन आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत इंडोनेशियाकडून पराभूत झाला. ही लढत इंडोनेशियाने ३-१ ने जिंकली.

एलोर सेतार (मलेशिया) : आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त बॅडमिंटन तारका पी.व्ही. सिंधू हिच्या विजयानंतरही भारतीय महिला संघ आज येथे बॅडमिंटन आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत इंडोनेशियाकडून पराभूत झाला. ही लढत इंडोनेशियाने ३-१ ने जिंकली. गुरुवारी जपानविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. या लढतीत सिंधू हिचा अपवाद वगळता सर्वच भारतीय खेळाडूंनी सामना गमावला होता. या स्पर्धेत भारताचा दुसरा पराभव होता. सिंधूने आज झालेल्या पहिल्या लढतीत फितरियानी हिचा २१-१३, २४-२२ असा पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघाने सलग तीन सामने गमावले. अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या भारतीय जोडीला ग्रेसिया पोल्ली आणि अप्रियानी राहायू यांनी एकतर्फी लढतीत २१-५, २१-१६ असे नमवले. दिवसातील दुसºया एकेरीच्या लढतीत इंडोनेशियाच्या हान्ना रमादिनी हिने प्रिया खुद्रावल्ली हिच्यावर २१-८, २१-१५ असा विजय मिळवला. महिलांच्या दुसºया दुहेरीच्या लढतीत अंजिया शिट्टा अवंदा आणि महादेवी इस्तारानी यांनी सिंधू आणि संयोगिता घोरपडे जोडीवर २१-९, २१-१८ अशी मात केली. (वृत्तसंस्था)

संबंधित

आशियाईच्या तयारीला पुरेसा वेळ मिळाला नाही
बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या खेळात कुठलीच उणीव नाही
सिंधूपुढे पुन्हा ओकुहाराचे आव्हान
पी. व्ही. सिंधू उपविजयी
सचिन तेंडुलकरने दिल्या सिंधूला शुभेच्छा

बॅडमिंटन कडून आणखी

अजय जयराम अंतिम फेरीत, व्हिएतनाम खुली बॅडमिंटन स्पर्धा
जयराम, मिथुन उपांत्य फेरीत
जयराम, रितुपर्णा उपांत्यपूर्व फेरीत
मुंबईकर मानसी पदक मिळवण्यासाठी सज्ज
आशियाईच्या तयारीला पुरेसा वेळ मिळाला नाही

आणखी वाचा