पीबीएल : कॅरोलिनाचा सायनावर विजय, श्रीकांत आणि कश्यपही पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:18 AM2018-01-08T01:18:22+5:302018-01-08T13:19:40+5:30

हैदराबाद हंटर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या लढतीत दमदार विजय मिळवला. हैदराबादच्या कॅरोलिना मरिन हिने अवध वॉरियर्सच्या सायना नेहवालला १५-५, १५-७ असे पराभूत केले. त्यासोबतच अवध वॉरियर्सच्या पारुपल्ली कश्यप, किदाम्बी श्रीकांत या स्टार खेळाडूंनादेखील या लढतीत पराभवाचा धक्का बसला.

PBL: Carolina Saina wins, Srikanth and Kashyap lost | पीबीएल : कॅरोलिनाचा सायनावर विजय, श्रीकांत आणि कश्यपही पराभूत

पीबीएल : कॅरोलिनाचा सायनावर विजय, श्रीकांत आणि कश्यपही पराभूत

Next

चेन्नई : हैदराबाद हंटर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या लढतीत दमदार विजय मिळवला. हैदराबादच्या कॅरोलिना मरिन हिने अवध वॉरियर्सच्या सायना नेहवालला १५-५, १५-७ असे पराभूत केले. त्यासोबतच अवध वॉरियर्सच्या पारुपल्ली कश्यप, किदाम्बी श्रीकांत या स्टार खेळाडूंनादेखील या लढतीत पराभवाचा धक्का बसला.
रविवारी सायंकाळी येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या पीबीएलच्या या लढतीत हैदराबाद हंटर्सच्या खेळाडूंनी अवध वॉरियर्सवर वर्चस्व गाजवले. हैदराबादच्या ली हुएन एल याने अवधच्या पारुपल्ली कश्यप याला १३-१५, १५-९, १५-१४ असे पराभूत केले. कश्यप याने पहिला गेम जिंकला, मात्र त्यानंतर त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. अवध संघाच्या किदाम्बी श्रीकांत यालादेखील पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हैदराबादच्या बी. साई प्रणित याने श्रीकांतला सरळ गेममध्ये १५-१०, १५-१० असे पराभूत केले. या संपूर्ण सामन्यावर साई प्रणित याने वर्चस्व राखले. काही वेळा या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या रॅली रंगल्या, मात्र साई प्रणित याने सरशी साधली. मरिन हिने सायना नेहवालवर एकतर्फी विजय मिळवला. मरिन हिने सायनाला वरचढ होण्याची एकही संधी दिली नाही. पुरुष दुहेरीत हैदराबादच्या मार्किस किडो आणि यु युन सेऊंग यांनी अवधच्या चीन चुंग आणि तांग मान यांचा १४-१५, १५-६, १५-११ असा पराभव केला. मिश्र दुहेरीच्या सामन्यात हैदराबादच्या पिया झेबदीएह बर्नाडिक्ट आणि सात्विकसाईराज वेंकारेड्डी यांनी अवधच्या ख्रिस्तिना पेडरसन आणि हेंद्रा सेतीयावान यांच्यावर १५-९, १५-९ असा विजय मिळवला. अवध वॉरियर्सला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही.
आकाश नेवे

Web Title: PBL: Carolina Saina wins, Srikanth and Kashyap lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.