पी. व्ही. सिंधूची दुस-या स्थानी झेप, जागतिक क्रमवारीत सायना, श्रीकांतचे स्थान कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 03:59 AM2017-09-23T03:59:34+5:302017-09-23T03:59:37+5:30

रिओ आॅलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती स्टार शटलर पी. व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत द्वितीय स्थानी पोहचली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या बीएफडब्ल्यू क्रमवारीमध्ये भारतीय खेळाडूंना फारसा फटका बसलेला नाही.

P. V. Leading runner-up Saina Nehwal, world number Saina Nehwal | पी. व्ही. सिंधूची दुस-या स्थानी झेप, जागतिक क्रमवारीत सायना, श्रीकांतचे स्थान कायम

पी. व्ही. सिंधूची दुस-या स्थानी झेप, जागतिक क्रमवारीत सायना, श्रीकांतचे स्थान कायम

Next


नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती स्टार शटलर पी. व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत द्वितीय स्थानी पोहचली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या बीएफडब्ल्यू क्रमवारीमध्ये भारतीय खेळाडूंना फारसा फटका बसलेला नाही.
नुकताच कोरिया ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या सिंधूने कारकिर्दीमध्ये दुसºयांदा जागतिक क्रमवारीत दुसर स्थान मिळवले आहे. याआधी सहा एप्रिलला जाहीर झालेल्या क्रमवारीमध्ये सिंधू दुसºया स्थानी आली होती. त्याचवेळी, ‘फुलराणी’ सायना नेहवालच्या क्रमवारीमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही. नव्या क्रमवारीमध्ये सायनाचे १२वे स्थान कायम राहिले आहे. विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिना मरिननेही आपले पाचवे स्थान कायम राखले आहे. त्याचवेळी, वर्ल्ड चॅम्पियन जापानची नोजोमी ओकुहाराने आपल्या क्रमवारीमध्ये एका स्थानाने प्रगती करताना आठवे स्थान पटकावले आहे.
पुरुषांमध्ये भारताचा आघाडीचा शटलर किदाम्बी श्रीकांत आठव्या स्थानी कायम आहे. त्याचवेळी, बी. साई प्रणीत आणि एच. एस. प्रणॉय यांना एका स्थानाचे नुकसान झाले असून दोघेही अनुक्रमे १७व्या आणि १९व्या स्थानी आले आहेत. अजय जयरामच्या क्रमवारीमध्ये तीन स्थानांची घसरण झाली असून तो २०व्या स्थानी आला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: P. V. Leading runner-up Saina Nehwal, world number Saina Nehwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.