Indonesia Open Badminton 2018 : गतविजेत्याला श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 11:11 PM2018-07-04T23:11:01+5:302018-07-04T23:11:57+5:30

भारताचा अव्वल खेळाडू आणि गतविजेता किदम्बी श्रीकांतचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे रियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपाची चोचुवोंगला नमवत पहिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Indonesia Open Badminton 2018: Defending champion Srikkanth loss in first round | Indonesia Open Badminton 2018 : गतविजेत्याला श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

Indonesia Open Badminton 2018 : गतविजेत्याला श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

Next

जकार्ता - भारताचा अव्वल खेळाडू आणि गतविजेता किदम्बी श्रीकांतचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जपानच्या केंटो मोमोटोकडून सुरुवातीला त्याला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे रियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपाची चोचुवोंगला नमवत पहिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.



जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन श्रीकांतला जपानच्या केंटो मोमोटाकडून एक तास चाललेल्या लढतीत २१-१२, १४-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. श्रीकांतचा गेल्या दोन आठवड्यातील मोमोटाकडून हा दुसरा पराभव आहे. मोमोटाकडून आत्तापर्यंत श्रीकांत सात वेळा पराभूत झाला आहे. 
सिंधूने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगला २१-१५, १९-२१, २१-१३ असे पराभूत करून पुढच्या फेरीतील आपली जागा निश्चित केली. तत्पूर्वी भारताच्या वैष्णवी रेड्डी जक्काला डेन्मार्कच्या लिने होजमार्क कजार्सफेल्टकडून १२-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला.

Web Title: Indonesia Open Badminton 2018: Defending champion Srikkanth loss in first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.