India's victory on the Maldives, 5-0 in the Maldives washed away | भारताचा मालदीववर दणदणीत विजय, मालदीवचा ५-० असा उडवला धुव्वा

एलोर सतार : जागतिक रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या किदाम्बी श्रीकांतच्या नेतृत्वात खेळणाºया भारतीय संघाने बुधवारी मालदीवला आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ५ - ० ने नमवले.
श्रीकांतने पहिल्या एकेरी सामन्यात शाहिद हुसेन जायन याचा एकतर्फी लढतीत २१-५, २१-६ असा पराभव केला. बी साई प्रणित याने अहमद निबाल याला १७ मिनिटातच २१-१०, २१-४ असे पराभूत केले. समीर वर्माने तिसºया एकेरीत मोहम्मद अर्सलान याला २१-५, २१-१ असे पराभूत करत भारताला ३ -० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतरचे सामने भारतीयांसाठी औपचारिकतेचे ठरले. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी हुसेन जायन व शहीम हसन अफसीम यांना २१-८, २१-८ असे पराभूत केले.
त्यानंतर अर्जुन एमआर आणि श्लोक रामचंद्रन यांनी मोहम्मद अर्सलन अली आणि अहमद निबाल यांना २१-२, २१-५ असे पराभूत करत भारताचा ५ -० असा विजय निश्चित केला. (वृत्तसंस्था)


Web Title: India's victory on the Maldives, 5-0 in the Maldives washed away
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.