सिंधू, श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 05:09 AM2018-11-10T05:09:55+5:302018-11-10T05:10:33+5:30

आॅलिम्पिक रौप्य विजेती पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचे चीन ओपन विश्व टूर बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील पराभवासह आव्हान संपुष्टात आले.

Ending the challenge of Sindhu, Srikanth | सिंधू, श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात

सिंधू, श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात

Next

फुझोऊ(चीन) - आॅलिम्पिक रौप्य विजेती पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचे चीन ओपन विश्व टूर बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील पराभवासह आव्हान संपुष्टात आले.
महिला एकेरीत सिंधू स्थानिक खेळाडू ही बिगजियाओ हिचे कडवे आव्हान परतवून लावण्यात अपयशी ठरली. दुसरीकडे, श्रीकांत विश्व क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरील खेळाडू चायनीज तायपेईचा चोऊ तियेन चेन याच्याकडून सरळ गेममध्ये पराभूत झाला.
विश्व क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या बिगजियाओने तिसºया स्थानावरील सिंधूला १७-२१,२१-१७,१५-२१ ने पराभूत केले. बिगजियाओचा सिंधूवर हा तिसरा विजय ठरला. याआधी जुलै महिन्यात इंडोनेशिया ओपन तसेच आॅक्टोबरमध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये सिंधू पराभूत झाली होती. पुरुष एकेरी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत श्रीकांतकडे चेनच्या खेळाचे प्रत्युत्तर नव्हतेच. चेनने श्रीकांतला केवळ ३५ मिनिटांत २१-१४, २१-१४ ने सहज नमविले. चेनच्या आक्रमक व चपळ खेळापुढे श्रीकांतच अखेरपर्यंत निभाव लागला नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Ending the challenge of Sindhu, Srikanth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton