भारतीय बॅडमिंटनपटूंची निराशाजनक सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 03:08 AM2018-01-17T03:08:31+5:302018-01-17T03:08:39+5:30

प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडीला मोसमाच्या पहिल्या मलेशियाचा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही.

The disappointing start of Indian Badminton | भारतीय बॅडमिंटनपटूंची निराशाजनक सुरुवात

भारतीय बॅडमिंटनपटूंची निराशाजनक सुरुवात

Next

क्वालालम्पूर : प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडीला मोसमाच्या पहिल्या मलेशियाचा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. सिक्की व प्रणव यांना ली चुुन हेई रेगीनाल्ड व चाऊ होऊ वाहतो या सातव्या मानांकित हाँगकाँगच्या जोडीविरुद्ध १८-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.
भारताची प्राजक्ता सावंत व मलेशियाचा योगेंद्रन कृष्णन जोडीने मात्र मिश्र दुहेरीत दुसरी फेरी गाठली. या जोडीला सवान सेरासिंघे व सेत्याना मपासा या आॅस्ट्रेलियन जोडीविरुद्ध पुढे चाल मिळाली. पुरुष एकेरीत पात्रता फेरीचा अडथळा पार करणाºया पी. कश्यपला थायलंडच्या कंताफोन वांगचारियोनविरुद्ध १४-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला, तर शुभंकर डे डेन्मार्कच्या किम ब्रूनविरुद्ध २१-११, ११-२१, ९-२१ ने पराभूत झाला. 

महिला दुहेरीत क्वालिफायर अपर्णा बालन व श्रुती केपी यांना ओंग रे नी व वोंग जिया यिंग क्रिस्टल या सिंगापूरच्या जोडीविरुद्ध १२-२१, २१-१८, १५-२१ ने पराभव स्वीकारावा लागला; तर संयोगिता घोरपडे व प्राजक्ता जोडीला मलेशियाच्या
च्यू सिएन लिम व झेन याप या जोडीविरुद्ध
२०-२२, १८-२१ ने पराभव पत्करावा लागला.

Web Title: The disappointing start of Indian Badminton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton