Denmark Open Badminton : चार वर्षांनंतर सायनाने मिळवला 'या' खेळाडूवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 03:24 PM2018-10-18T15:24:50+5:302018-10-18T15:25:07+5:30

Denmark Open Badminton: सायना नेहवालने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Denmark Open Badminton: After Four years Saina Nehwal won against yamaguchi | Denmark Open Badminton : चार वर्षांनंतर सायनाने मिळवला 'या' खेळाडूवर विजय

Denmark Open Badminton : चार वर्षांनंतर सायनाने मिळवला 'या' खेळाडूवर विजय

Next

डेन्मार्क : सायना नेहवालनेडेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अकाने यामागुचीचा 21-15, 21-17 असा पराभव केला. आठ सामन्यांत सायनाला दुसऱ्यांदा यामागुचीला नमवण्यात यश आले. सायनाने 2014 मध्ये चीन ओपन स्पर्धेत यामागुचीला अखेरचे नमवले होते.

भारताच्या सायनाने सुरुवातीपासून सामन्यावर पकड घेत जपानी खेळाडूला हतबल केले होते. पहिल्या गेममध्ये 10-10 अशी बरोबरी असताना सायनाने उल्लेखनीय खेळ करताना 21-15 अशा विजयाने 1-0 अशी आघाडी घेतली. 



दुसऱ्या गेममध्ये यामागुचीने 7-2 अशी आघाडी घेत सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, 11-11 अशी बरोबरी असताना सायनाने सामना 17-17 असा आणला. त्यानंतर सायनाने सलग चार गुण घेत 21-17 अशी बाजी मारली. 

Web Title: Denmark Open Badminton: After Four years Saina Nehwal won against yamaguchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.