China Open Super 1000 : सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत, सायना पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 07:25 PM2018-09-18T19:25:55+5:302018-09-18T19:26:11+5:30

China Open Super 1000: ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर सायना नेहवालला चुरशीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला.

China Open Super 1000: P.V Sindhu sails into Pre-QF, saina out | China Open Super 1000 : सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत, सायना पराभूत

China Open Super 1000 : सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत, सायना पराभूत

googlenewsNext

चांगझू : ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर सायना नेहवालला चुरशीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या मानांकित सिंधूने या स्पर्धेत पहिल्या फेरीच्या लढतीत जपानच्या सेइना कावाकामीचा 21-15, 21-13 ने पराभव केला. 



राष्ट्रकुल स्पर्धेची सुवर्णपदक विजेती व 2014 मध्ये चीन ओपनचे जेतेपद पटकावणाऱ्या सायनाला 48 मिनिट रंगलेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत कोरियाच्या सुंग जी ह्यूनविरुद्ध 22-20, 8-21, 14-21 ने पराभव स्वीकारावा लागला. 


मनू अत्री व बी. सुमित रेड्डी या राष्ट्रीय विजेत्या जोडीने लियाओ मिन चून व सू चिंग हेंग या चिनी ताइपेच्या जोडीचा 39 मिनिटांमध्ये 13-21, 21-13, 21-12 ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली. 


सिंधू व कावाकामी यांची लढत सुरुवातीला चुरशीची झाली. पण त्यानंतर भारतीय खेळाडूने 13-7 ने आघाडी घेतली. सिंधूने रॅलीमध्ये वर्चस्व गाजवले आणि पहिला गेम सहज जिंकला. दुस:या गेममध्ये सिंधूने शानदार सुरुवात करताना 6-क् अशी आघाडी घेतली. कावाकामीने पुनरागमन करताना स्कोअर 8-10 करण्यात यश मिळवले. भारतीय खेळाडूने ब्रेकर्पयत 11-9 अशी आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर सिंधूने 15-11 ची आघाडी घेतली आणि 20-12 च्या स्कोअरवर 8 मॅच पॉईंट मिळवत सहज विजय साकारला.  

Web Title: China Open Super 1000: P.V Sindhu sails into Pre-QF, saina out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.