Asian Games 2018 LIVE: ट्रॅप प्रकारात लक्ष्यने रौप्यपदक जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 08:47 AM2018-08-20T08:47:04+5:302018-08-20T15:27:34+5:30

Asian Games 2018 Live : आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाने मोहिमेची सुरूवात करणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून दुसऱ्या दिवशीही पदकाच्या अपेक्षा आहेत.

Asian Games 2018 Live: p. V. sindhu victory; Indian women's team take lead | Asian Games 2018 LIVE: ट्रॅप प्रकारात लक्ष्यने रौप्यपदक जिंकले

Asian Games 2018 LIVE: ट्रॅप प्रकारात लक्ष्यने रौप्यपदक जिंकले

googlenewsNext

- #Shooting पुरूषांच्या ट्रॅप प्रकारात भारतीय नेमबाज लक्ष्यने रौप्यपदक जिंकले



 

- साक्षी मलिकच्या पराभवानंतर झालेल्या विनेश फोगटच्या सामन्यात भारतीय खेळाडूने 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्य फेरीत उजबेकिस्तानच्या याकशिरमुरातोव्हा डौबेटबीकेचा 10-0 असा दारूण पराभव केला. 

 अखेरच्या क्षणापर्यंत आघाडीवर असलेल्या भारताच्या साक्षी मलिकचे आव्हान अखेरच्या पाच सेकंदात संपुष्टात आले. कझाकस्तानच्या टिनबेकोव्हा एसुलूने उपांत्य फेरीत साक्षीवर 8-7 अशा फरकाने बाजी मारली. 

-#Wrestling साक्षी मलिकने कझाकस्तानच्या कॅसीमोव्हा अयायूलीमचा 10-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक दिली.



 -#Tennis कर्मान थंडीचा बाद फेरीत प्रवेश. मंगोलियाच्या जाग्राल अल्तानसरनाईचा 6-1, 6-0 असा पराभव केला


#Shooting मानवजीत सिंग संधू आणि लक्ष्य यांनी पुरूषांच्या ट्रॅप प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 



 

- #Wrestling पूजाने 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना उजबेकिस्तानच्या नाबिरा एसेनवाएव्हाचा 12-1 असा पराभव केला.

- #Wrestling विनेशने 50 किलो गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तिने कोरियाच्या किम ह्यूंगजूचा 11-0 असा पराभव केला. 



 

- #Wrestling रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकचा विजय. 62 किलो वजनी गटात थायलंडच्या सॅलिनी श्रीसोम्बॅटवर दणदणीत विजय

- #Wrestling पूजा धांडा उपांत्यपूर्व फेरीत, महिलांच्या 57 किलो वजनी गटात थायलंडच्या ओसारावर विजय



 

- #Wrestling पुरूषांच्या 125 किलो फ्रीस्टाईल गटात भारताच्या सुमित मलिकला हार पत्करावी लागली. इराणच्या हादीबामांज परवीजने 10-0 असा विजय मिळवला.

-#Basketball चायनीज तैपेईने बास्केटबॉल गटातील महिला गटात भारतावर 84-61 असा विजय मिळवला. 

#Wrestling महिलांच्या 50 किलो वजनी गटात विनेश फोगटने चीनच्या सून यननचा 8-2 असा पराभव केला.



 

- #Shooting अपूर्वी चंडेलाचे पदक हुकले. 10 मीटर एअर रायफल गटाच्या अंतिम फेरीत पाचवे स्थान



 

- #Badminton भारतीय महिला संघाला पराभवाचा धक्का, जपानने 3-1 अशा फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

- #Shooting भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेलाने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. एलावेनील वालारीवनला 14व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

- #Tennis अंकिता रैनाने महिला एकेरीत बाद फेरीत प्रवेश केला. तिने इंडोनेशियाच्या गुमुल्या बेट्रीसवर 6-2, 6-4 असा विजय मिळवला. 

- #Badminton सायना नेहवालचे कमबॅक, पण भारत 1-2 पिछाडीवर. जपानच्या नोझोमी ओकुहाराचे कडवे आव्हान मोडून काढताना सायनाने स्पर्धेतील आव्हान जीवंत राखण्याचे प्रयत्न केले, परंतु ओकुहाराने 21-11, 25-23, 21-16 असा विजय मिळवला.

- #Rowing पुरूष संघाने 6.15.18 सेंकदाच्या वेळेसह अंतिम फेरीत प्रवेश केला.

नेमबाज दीपक कुमारला रौप्यपदक, भारताच्या खात्यात आणखी एक पदक

- भारताच्या दीपक कुमारने 10 मीटर एअर रायफल पुरूष गटात रौप्यपदकाची कमाई केली. मात्र रवी कुमारला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 



 


- #kabaddi भारताच्या महिला संघाने अ गटात चुरशीच्या लढतीत थायलंडवर 33-23 असा विजय मिळवला
 

- आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाने मोहिमेची सुरूवात करणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून दुसऱ्या दिवशीही पदकाच्या अपेक्षा आहेत. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत जपानविरूद्ध विजयी सुरूवात केली आणि 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने महिली एकेरीच्या लढतीत जपानच्या अकाने यामागुचीवर 21-18, 21-19 असा विजय साजरा करून भारताला आघाडी मिळवून दिली आहे. 

- #SepakTakraw सापेकटक्रावमध्ये भारताने विजयाने प्रारंभ केला. भारतीय संघाने सलामीच्या सामन्यात इराणवर 21-16, 19-21, 21-17 असा विजय मिळवला.  


-#Badminton दुहेरीत सारा सुनील आणि एन सिक्की रेड्डी यांना पराभप पत्करावा लागल्याने जपानने सामन्यात 1-1 असे पुनरागमन केले आहे. जपानच्या सयाका हिरोटा आणि युकी फुकुशिमा यांनी 21-15, 21-6 असा सहज विजय मिळवला.  



10 मीटर एअर रायफल प्रकारातील मिश्र दुहेरीत अपूर्वी चंडेलासह कांस्यपदक जिंकणाऱ्या रवी कुमारने दुसऱ्या दिवशी 10 मीटर एअर रायफल पुरूष गटाच्या अंतिम फेरीत प्रेवश केला. त्याने पात्रता फेरीत 626.7 गुणांची कमाई केली. त्याच्यासह भारताच्या दीपक कुमारने 626.3 गुणांसह अंतिम फेरीत स्थान पक्के केले आहे आणि दोघेही सुवर्णपदकाचे दावेदार आहेत. 
 



भारताच्या दुष्यंतने रोईंगमध्ये पुरूषांच्या लाईटवेट सिंगल स्कल प्रकाराच्या अंतिम फेरीचे तिकीट पटकावले. त्याने 7.43.08 सेकंदाची वेळ नोंदवताना ही कामगिरी केली. 

Web Title: Asian Games 2018 Live: p. V. sindhu victory; Indian women's team take lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.