अजय जयराम अंतिम फेरीत, व्हिएतनाम खुली बॅडमिंटन स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 06:21 AM2018-08-12T06:21:24+5:302018-08-12T06:21:49+5:30

भारताचा स्टार खेळाडू अजय जयराम हा मोसमातील पहिल्या विजयापासून केवळ एक पाऊल दूर असून शनिवारी जपानच्या यू इमाराशी याला नमवून त्याने व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

Ajay Jayaram in the final round, Vietnam Open Badminton Tournament | अजय जयराम अंतिम फेरीत, व्हिएतनाम खुली बॅडमिंटन स्पर्धा

अजय जयराम अंतिम फेरीत, व्हिएतनाम खुली बॅडमिंटन स्पर्धा

googlenewsNext

हो ची मिन्ह सिटी - भारताचा स्टार खेळाडू अजय जयराम हा मोसमातील पहिल्या विजयापासून केवळ एक पाऊल दूर असून शनिवारी जपानच्या यू इमाराशी याला नमवून त्याने व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
अजयची अंतिम फेरीत गाठ पडेल ती इंडोनेशियाचा शेसार हिरेन याच्याशी. शेसारने भारताचा मिथून मंजूनाथ याच्यावर दुसऱ्या उपांत्य सामन्यात २१-१७, १९-२१, २१-१४
अशी तीन गेममध्ये मात केली. भारतीय बॅडमिंटनपटू एखाद्या
स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाल्याची तीन आठवड्यातील ही तिसरी वेळ आहे.
मागच्या रविवारी आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू चीनच्या नानजिंगमध्ये विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्पेनची कॅरोलिना मारिनकडून पराभूत झाली होती. त्याआधी भारताचा
सौरभ वर्मा रशियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेता ठरला
होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Ajay Jayaram in the final round, Vietnam Open Badminton Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.