After losing, both teams of India are in the knockout stage | पराभवानंतरही भारताचे दोन्ही संघ बाद फेरीत
पराभवानंतरही भारताचे दोन्ही संघ बाद फेरीत

एलोर सेतार (मलेशिया) : भारतीय महिला बॅडमिंटन संघ बॅडमिंटन आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत जपानकडून १-४ पराभवानंतरही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. भारताच्या पुरुषांनीही इंडोनेशियाविरुद्धच्या पराभवानंतर आगेकूच केली.
सिंधूने बलाढ्य अकाने यामागुचीला सहज नमावले. भारतीय पुरुषांचा इंडोनेशियाविरुद्ध २-३ असा पराभव झाला. किदाम्बी श्रीकांत, अर्जुन एम. आर. - रामचंद्रन श्लोक आणि बी. सुमित रेड्डी यांच्या पराभवाचा भारताला फटका बसला. त्याचवेळी, सात्विकसाईराज - चिराग शेट्टी व बी. साई प्रणीतने आपआपल्या लढती जिंकत आशा कायम राखल्या होत्या. (वृत्तसंस्था)
>भारतीय पुरुषांनी २-१ अशी आघाडी मिळवल्यानंतर इंडोनेशियाविरुद्ध संधी गमावली. आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त सिंधूने यामागुची हिचे आव्हान २१-१९, २१-१५ असे मोडीत काढले. आता तिचा यामागुची हिच्याविरुद्धचे विजयाचे रेकॉर्ड ५-३ असे झाले आहे. भारताच्या श्रीकृष्ण प्रिया हिला १३ व्या क्रमांकावरील खेळाडू सयाका सातो हिने २१-१२, २१-१0, असे पराभूत केले. अश्विनी पोनप्पाला जागतिक १६ व्या मानांकित अया ओहोरी हिने २१-१४, २१-१२ असे नमवले.
>दुहेरीत संयोगिता घोरपडे आणि प्राजक्ता सावंत यांना शिहो तनाका आणि कोहारू योनेमोतो यांनी २१-१७, २१-१७ असे पराभूत केले, तर एन. सिक्की रेड्डी आणि पोनप्पा यांना मिसाकी मत्सुतोमो आणि अयाका तकाहाशी यांनी २१-१८, २१-१८ अशी मात दिली.

 


Web Title: After losing, both teams of India are in the knockout stage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.