भारताचे सुवर्ण हुकले, किदम्बी श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 08:23 AM2018-04-15T08:23:56+5:302018-04-15T08:24:21+5:30

बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतला पराभवचा सामना करावा लागला.

2018 Commonwealth Games badminton : Kidambi Srikanth settles for silver | भारताचे सुवर्ण हुकले, किदम्बी श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान

भारताचे सुवर्ण हुकले, किदम्बी श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान

googlenewsNext

गोल्ड कोस्ट - बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतला पराभवचा सामना करावा लागला. बॅटमिंटममध्ये अव्वल स्थानावर असेल्या किदम्बी श्रीकांतचा मलेशियाच्या ली चोंग वेईने 2-1 अशा फरकाने पराभव केला. श्रीकांतच्या या पराभवामुळं भारताचे एक सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले आहे. श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. भारताकडे आता 26 सुवर्ण आणि 19 रौप्य पदके आहेत. चोंग वेईने श्रीकांतचा 21-19 , 14-21 आणि 14-21 असा पराभव केला. 

श्रीकांतने पहिला गेम जिंकून 21-19 अशा परकारने जिंकून सुवर्णपदाकाकडे वाटचाल केली होती. मात्र दुसऱ्या गेममध्ये मलेशियाच्या चोंग वेईने जबरदस्त पुनरागमन केले. चोंग वेईने दुसरा गेम 14-21 असा मोठ्या फरकाने जिंकत श्रीकांतवर आघाडी मिळवली. दुसऱ्या गेममध्ये आघाडी घेतल्यानंतर चोंग वेईने तिसरा गेम सहज जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरलं. चोंग वेईने तिसरा गेम 14-21 असा जिंकला. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटममध्ये श्रीकांतने केलेल्या चुका करत चोंग वेईला गुण बहाल केले. 

Web Title: 2018 Commonwealth Games badminton : Kidambi Srikanth settles for silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.