पावसाळ्यात टायर पंक्चर किंवा वाहने का घसरतात? कशी काळजी घ्यावी...

By हेमंत बावकर | Published: September 4, 2018 04:17 PM2018-09-04T16:17:52+5:302018-09-04T16:21:25+5:30

उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे. 

Why vehicle slips or get puncture in rainy season | पावसाळ्यात टायर पंक्चर किंवा वाहने का घसरतात? कशी काळजी घ्यावी...

पावसाळ्यात टायर पंक्चर किंवा वाहने का घसरतात? कशी काळजी घ्यावी...

googlenewsNext

मुंबई : उन्हाळा किंवा हिवाळ्याच्या तुलनेत कार किंवा बाईक घसरण्याच्या  घटना पावसाळ्यात जास्त घडतात. याचसोबत टायर पंक्चर होण्याचा धोकाही वाढतो. उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे. 


महाराष्ट्रात सरासरी 60 ते 70 दिवस पाऊस असतो. कोकणात तर जवळपास १०० दिवस पावसाचेच असतात. काहीवेळा दलदलीची जमीन किंवा रस्त्यांची निकृष्ट कामे यामुळे रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडलेले असतात. या खड्डयांमुळे आधीच वेग मंदावलेला असल्याने त्रस्त असलेले वाहनचालक टायर पंक्चर किंवा वाहन घसरल्यास आणखी अडचणीत सापडतात. प्रवासावेळी प्रत्येकदा पंक्चर काढणारा भेटेलच असे नाही. या प्रकारांपासून वाचण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही टीप्स...


पावसाचे पाणी जेव्हा रस्त्यावर साचलेले असते, तेव्हा खडी निखळलेली असते. यावेळी वरून टायर जात असताना खडीचे छोटे छोटे अनुकुचिदार तुकडे टायरमध्ये घुसतात. यामुळे टायर पंक्चर होण्याची शक्यता असते. पाणी साचलेल्या रस्त्यावर टायरची ग्रिप कमी होते. यावेळी वेगात असल्यास व अचानक ब्रेक दाबल्यास टायर घसरतात. यामुळे बऱ्याचदा अपघातही होतात. 


यामुळे अशा प्रसंगांपासून बचावासाठी काय करायला हवे. असे प्रसंग तर नेहमीच उद्भवतात. आपण काय चुका करतो माहितीये, कारचे किंवा बाईकच्या टायरची ग्रीप संपेपर्यंत वापरतो. टायर गुळगुळीत झाल्याने वाहने घसरतात. यासाठी टायरवर 3 एमएम रबर असणे गरजेचे असते. एवढा रबर (ग्रीप) नसल्यास टायर त्वरीत बदलने आवश्यक ठरते. 


 भारतीय रस्त्यांनुसार जास्तीत जास्त 80 किमीचा वेग असणे कायदेशीर आहे. तर एक्सप्रेस हायवेवर तो नुकताच १२० किमी करण्यात आला आहे. या वेगात गाडी नियंत्रणात राहते. यामुळे गाडी घसरण्याची किंवा टायर फुटण्याची शक्यता कमी होते. 


टायरमध्ये हवा कमी-जास्त असल्यासही गाडी घसरू शकते. कार कंपनी जेवढा दाब सांगते तेवढा दाब ठेवल्यास आपण सुरक्षित राहतो. टायरचे प्रेशर पॅसेंजर, सामानानुसार बदलत असते. याबाबतची माहीती चालकाच्या दरवाजा उघडल्यावर दिसते. 


वेगात असताना अचानक मोठे खड्डे येतात. यावेळी आपण एकतर अचानक ब्रेक दाबतो किंवा गाडी तशीच खड्ड्यातून आदळवत नेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. यावेळी एकतर गाडी घसरते किंवा टायरची रिम बेंड होते. अलॉय व्हील असल्यास त्याला तडे जातात. यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होते. अलॉय व्हील असल्यास त्वरित बदलावे. लोखंडी रिम असल्यास तिचा बेंड काढून घ्यावा व व्हील अलाईनमेंटही करून घ्यावे.

Web Title: Why vehicle slips or get puncture in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.