कार धुवा स्वतःची स्वतः... पाणीही वाचवा आणि पैसेही वाचवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 08:43 AM2017-12-11T08:43:42+5:302017-12-11T08:44:40+5:30

बाहेर कार धुणे सर्वांनाच परवडणारे व भावणारे असते असेही नाही. पाणी वाचवून घरच्याघरी ते काम मनाजोगते करता येते. अर्थात ज्यांना वेळ असेल, आवड असेल त्यांना हा पर्याय नक्की आवडेल.

Wash the car yourself ... save the water and save money too | कार धुवा स्वतःची स्वतः... पाणीही वाचवा आणि पैसेही वाचवा

कार धुवा स्वतःची स्वतः... पाणीही वाचवा आणि पैसेही वाचवा

ठळक मुद्देसर्वांनाच काही दररोज कार धुणे शक्य होते असे नाही. तसेच गॅरेजवर सतत नेऊन कार धुणेही काहींना परवडत नाही, पटत नाही. मुळात मुंबईसारख्या शहरांमध्ये काय पाणी वापरणे व अवास्तवपणे वा वाट्टेल तसे वापरणे मनाला पटणारे नसते. किमान पाणी वापरून कार वा स्कूटर वा तत्सम प्रवासी छोटी, मध्यम वाहने धुणे आपल्याला घरी शक्य अर्थात, त्यासाठी काहीसे जास्त श्रम पडतात.

सर्वांनाच काही दररोज कार धुणे शक्य होते असे नाही. तसेच गॅरेजवर सतत नेऊन कार धुणेही काहींना परवडत नाही, पटत नाही. मुळात मुंबईसारख्या शहरांमध्ये काय पाणी वापरणे व अवास्तवपणे वा वाट्टेल तसे वापरणे मनाला पटणारे नसते. मात्र यासाठीच कार सतत धुणे व ती स्वच्छ राहाते यातच समाधान मानणारे लोक कमी नाहीत. अर्थात त्यामधील अनेक लोक कार स्वतः धुणारे नसतात. ते गॅरेजला वा बाहेर कार वॉशिंग करणा-या अन्य ठिकाणी कार नेत असतात. पण हे सातत्याने करणे हा तसा पाहिला तर पाण्याचा अपव्यय असतो. किमान पाणी वापरून कार वा स्कूटर वा तत्सम प्रवासी छोटी, मध्यम वाहने धुणे आपल्याला घरी शक्य अर्थात, त्यासाठी काहीसे जास्त श्रम पडतात. हे श्रम कमी कसे होतील ते पाहाणे महत्त्वाचे आहे. ज्यांना आपली कार स्वतःच धुणे वा साफ करणे आवडते त्यांच्यासाठी काही वेगळी पद्धत वापरता येते की नाही ते महत्त्वाचे आहे. 

हाताने वापरण्याचा स्प्रे बाजारात अतिशय स्वस्त दराने मिळतो. अगदी त्या स्प्रेवरील स्प्रेगन तर अगदी 15 ते 20 रुपयांमध्ये मिळते.ती शीतपेयाच्या बाटलीवरही छान बसते. मात्र ती वापरण्याने हात व बोटे दुखू शकतात. एकावेळी तुम्हाला जास्त पाणी न वापरता मात्र त्याद्वारे कार गॅरेजमध्ये धुतल्यासारखी नव्हे पण ब-यापैकी धुता येते. तर दुसरा उपाय म्हणजे शेतीसाठी किटकनाशकांची फवारणी करण्याचा पंप वापणे. हा पंप हाताने हवा भरून स्प्रेद्वारे हवा भरण्याचा असतो. तर दुसरे काही पंप त्याच प्रकारचे वीजेवर वा कारच्या बॅटरीवर किंवा चार्जिंग बॅटरीवर चालणारे असतात. शेतीसंबंधित वस्तू मिळणा-या दुकानांमध्ये किंवा ऑनलाइन विक्री करणा-या पोटर्लवरही ते मिळतात. त्यांची किंमत साधारण 800 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत आहे. तुम्ही त्याचा वापर करून कार धुण्याचे काम करू शकता.

यामध्ये हाताने वापरण्याचा पंप हा तसा पाहायला गेला तर स्वस्त, ब-यापैकी काम देणारा आहे. साधारण 800 ते 900 रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे. त्यातून कारवर थेट एका धारेचा वा स्प्रेचा मारा पाण्याने करता येतो. मोठ्या प्लॅस्टिक बाटल्यामध्ये साधारण 5 लीटर ते 8 लीटर पाणी भरता येते. त्याला हातपंपासारखा भाग असतो, त्याने प्रेशर देऊन मग पाइपाला जोडलेल्या पाण्याच्या स्प्रेगनने कारवर पाणी मारता येते. त्यात स्प्रेचे पाणी बारीक थेंबाच्या स्वरूपात मारता येते. मात्र त्याने धूळ वा कचला बाजूला उडला जाईल अशी ताकद नसते. मात्र अशा पंपाद्वारे कार घरी चांगल्या पद्धतीने धुता येते.

प्रथम कारवरील धूळ फडक्याने वा मायक्रोफायबरच्या ब्रशने साफ करा, त्यानंतर या शेतीपंपाच्या हातपंपाद्वारे कारच्या एकेका पभागात पाणी मारून नंतर लगेच लिक्विड सोपचा वा शांपूचाही वापर करून प्लॅस्टिक गॉझ किंवा फडक्याने फेस पसरून पाण्याच्या सहाय्याने पृष्ठभाग स्वच्छ करा. त्यानंतर पुन्हा हातपंपाच्या सहाय्याने साबणामुळे वा शांपूमुळे तयार झालेला फेस बाजूला करण्याचा प्रयत्न करत अन्य फडक्याने पुसून घ्या. त्यामुळे एकाचवेळी दोन कामे साध्य होतील. पाणी कमी वापरून कार ब-याच अंशी पुसून होईल. कारचा एक एक भाग केल्याने ताण हलका होईल व हातपंपाने मारलेल्या पाण्याचा संतुलीत वापरही करता येईल. कारचा टप प्रथम त्यानंतर मागील पुढील काचा, त्यनंतर दोन्ही बाजूच्या दरवाजांची बाजू व बॉनेट, सेदान असेल तर डिक्कीचा भाग असे एक एक करीत स्वच्छ केल्यास वेळ काहीसा कमी लागेल कारण त्या कामाचा ताण फारसा तुमच्या हातावर पडणार नाही.

हे काम झाल्यानंतर जिथे काही आणखी आवश्यक पुसणे गरजेचे असेल तेथे ओलसर फडक्याने ते पुसून लगेच सुक्या फडक्यानेही तो भाग पुसता येईल. कार ओल्या स्वरूपात तशीच ठेवू नका, ती शक्यतो सुकी करण्याचा प्रयत्न करा. शेतीसाठी वापरल्या जाणा-या या हातपंपाने तुमचे काम बरेच हलके होईल, गतीने होईल. अर्थात गॅरेज वा वीजेच्या पंपाने जोरदार प्रेशरखाली पाण्याचा मारा करणा-या स्प्रेशी वा कार वॉशिंग सेंटरशी याची तुलना करू नका, मात्र एक खरे की कार धुण्याचे समाधान फार पाणी वाया न घालवता तुम्हाला मिळू शकेल. तसेच फार वेळही त्यासाठी द्यावा लागणार नाही. बादलीत पाणी घेऊन फडके त्यात बुचकळून खार पुसण्याच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत मात्र बरीचशी सुखावह आहे. त्यासाठी माणूस ठेवण्याचीही गरज नाही. हे नक्की.

Web Title: Wash the car yourself ... save the water and save money too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.