कार चोरीपासून संरक्षण करण्यासाठी स्टिअरिंग लॉकचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 09:14 AM2017-11-20T09:14:02+5:302017-11-20T09:14:35+5:30

कार चोरीला जाऊ नये म्हणून अनेक प्रकारची कुलुपे आज अस्तित्त्वात आहेत. अगदी मॅन्युएल प्रकारच्या लॉकपासून ते इलेक्ट्रॉनिक वा डिजिटल लॉकपर्यंतची लॉक्स आहेत.

Use of steering lock to protect against car theft |  कार चोरीपासून संरक्षण करण्यासाठी स्टिअरिंग लॉकचा वापर

 कार चोरीपासून संरक्षण करण्यासाठी स्टिअरिंग लॉकचा वापर

googlenewsNext

कार चोरीला जाऊ नये म्हणून अनेक प्रकारची कुलुपे आज अस्तित्त्वात आहेत. अगदी मॅन्युएल प्रकारच्या लॉकपासून ते इलेक्ट्रॉनिक वा डिजिटल लॉकपर्यंतची लॉक्स आहेत. स्टिअरिंग लॉक हे ही त्यातलेच. मुळात सर्व प्रकारची सावधानता बाळगणे हे मात्र आपल्या हाती आहे ते नाकारता येणार नाही.

कारच्या स्टिअरिंगला आज नव्या पद्धतीमधील मोटारींना देण्यात येणाऱ्या सेन्सर्सच्या चाव्यामुळेच स्टिअरिंग लॉक करण्याची सोय अते. पूर्वी तसे प्रकार नव्हते. आजही अनेक श्रेणीमधील मोटारींमध्ये स्टिअरिंग लॉक ही चावीवरच वा इग्निशनच्या चावीद्वारेच लॉक करण्याची सुविधा नसते. विशेष करून किनष्ठ स्रेणीतील मोटारींना फार सुविधा दिलेल्या नसतात. अशावेळी स्टिअरिंगसाठी लॉक असणे ही अनेकांना आजही आवश्यक अशी सुविधा वाटते. ती गरजेची नक्कीच आहे. मुळात कार चोरणार्यांना आज सेंट्रल डोअर लॉकिंग सिस्टिम किंवा सेन्सर्सच्या नव्या आधुनिक सुविधेमुळे कार चोरणे हे देखील तसे सोपे नाही. तरीही कारच्या चोर्या होत असतात. या सर्वांवर उपाय म्हमून कारच्या स्टिअरिंगला, दरवाजांना, एक्सलेरेटर, ब्रेक, क्वच यांच्या पॅडलना गीअरला स्वतंत्रपणे लॉक करण्याची सुविधा बसवून घेता येते. त्यापैकीच स्टिअरिंग लॉक ही एक सुविधा आहे. सध्याच्या कारना इग्निशनच्या चावीवरच सेन्सर्स पद्धतीने इंजिनकार्याशी जुळवले गेले असल्याने डुप्लीकेट चावीनेही कार सुरू करणे जमणारे नाही. अर्थात ज्या माणसाने चावीने उघडणारे कुलूप बनवले त्याच माणसाने ते कुलूप त्याच्या दिलेल्या चावीशिवाय कसे उघडता येईल, याचाही शोध लावलेला आहे. रिव्हर्स इंजिनिअरिंग हे जगभरात प्रत्येक काळात चालूच असते, त्यातलाच हा एक प्रकार आहे. स्टिअरिंग लॉक हा त्या चोऱ्या टाळण्यावरचा एक उपाय आहे.

आधुनिक काळातील स्टिअरिंग लॉक ही स्टिअरिंग कॉलमला बसवलेली असतात. स्टिअरिंद व्हीलच्या खाली ती बसवलेली असतात. इग्निशन स्विचला कंबाईन असणारे हे लॉक असते. मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक अशा दोन्ही प्रकारात ते मिळते. केवळ स्टिअरिंग लॉक करणारे जसे लॉक येते, तसेच पॅडल व स्टिअरिंग या दोहोंना लॉक करणारेही लॉक येते. या प्रकारात स्टिअरिंग व पॅडल एका लांब हुकासारख्या सळीने परस्परांशी संबंधित असतात. मात्र हे लांबलचक असते, त्यामुळे ते लॉक करताना काहीसे कष्टही घ्यावे लागतात.  व्हीलमध्ये आडवे दांडके घालून स्टिअरिंग लॉक करणारीही लॉक्स आहेेत. आज आधुनिक कारमध्ये तुमच्या चावीवरच स्टिअरिंग लॉक होते, चावीला असलेल्या सेन्सर्समुळे जसे ते लॉक होते, तसेच ती पद्धत नसलेल्या कारमध्येही इग्निशनमधून चावी बाहेर काढताच हँडल लॉक होते. तशा प्रकारचे लॉक खोलणेही तसे सोपे नसते. मात्र कितीही प्रकार केले गेले असले तरी चावीविना कारमध्ये एंट्री करता येते, त्यासाठी असलेल्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये वेव्हज असतात, तशा कारही चोरीला जाऊ शकतात. तुमच्या ऑटोमॅटिक दरवाजा उघडण्याच्या नव्या पद्धतीमध्ये तुमच्या चावी व संलग्न लॉकच्या वेव्हज पकडूनही कार चोरीला जाऊ शकते, त्याबाबत काही काळापूर्वी सोशल मिडियावरही मेसेज फिरत होते.

विशेष करून मॉलसारख्या वा चित्रपटगृहासारख्या ठिकाणी अनेक आधुनिक चौरही निर्माण झाले असल्याचे सांगणारे हे मेसेज होते. अर्थात काही झाले तरी मॅन्युएल लॉक उघडायचे म्हटले तरी खूप कष्ट पडतात व वेळही जातो. तर आधुनिक संगणक युगामध्येही त्या प्रणालीला अनुसरून तसे कार चोर जर तयार होत असतील तर कारला लॉक करायचे तरी कसे असा प्रश्नही अनेकांना पडू शकतो. काही असले तरी लॉक लावले गेले पाहिजे, जे लॉक आहे, ते नीट लागते की नाही, ते नीट लावले गेले आहे की नाही, याची मात्र प्रत्येकाने दरवेळी खात्री केली तरी खूप आहे. अनेकदा चोराच्या हुशारीमुळे नव्हे तर कार मालक वा चालकाच्या हलगर्जीपणामुळेही लॉक तोडली गेलेली आहेत, हे ही नाकारता येणार नाही.

Web Title: Use of steering lock to protect against car theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार