समजून घ्या कारमधील विविध कामांसाठीच्या 'स्विचेसच्या कळा', स्विचेच करतात महत्त्वाचे काम

By ऑनलाइन लोकमत on Mon, October 30, 2017 7:00am

कार वा वाहनांचे स्विच हे तसे चांगल्यापैकी टिकण्याच्यादृष्टीने बनवलेले असतात. मात्र त्यांची हाताळणी नीट होणे गरजेचे आहे. एसटी बसचा चालक अप्पर-डिप्पर का देत नाहीत, असा प्रश्न मुंबईच्या बाहेर महामार्गावरून रात्रीच्यावेळी जाताना नेहमी पडायचा. 

कार वा वाहनांचे स्विच हे तसे चांगल्यापैकी टिकण्याच्या दृष्टीने बनवलेले असतात. मात्र त्यांची हाताळणी नीट होणे गरजेचे आहे. एसटी बसचा चालक अप्पर-डिप्पर का देत नाहीत, असा प्रश्न मुंबईच्या बाहेर महामार्गावरून रात्रीच्यावेळी जाताना नेहमी पडायचा. एकदा प्रत्यक्ष एका ड्रायव्हरशी बोललो तेव्हा त्याने सांगितले की, बसला विविध ड्रायव्हर हाताळतात. प्रत्येकाच्या हाताचे वजन संलग्न स्विचेसवर वेगवेगळे पडत असते, त्याची हाताळणी नीट होत नाही. तसेच हे स्विचेस स्वस्त नाहीत, महाग असतात. त्यामुळे वारंवारही बदलणे शक्य नसते. सांगायचा मुद्दा हा की वाहनाला असणारे विविध प्रकारचे स्विचेस हे नित्यनेमाने हाताळले जातात, कार, बस, ट्रक, स्कूटर अशा सर्व वाहनांना स्विचेच हे खूप महत्त्वाचे काम करीत असतात. त्यांची सुयोग्य हाताळणी करणे हे गरजेचे असते.  वायपर व साइड इंडिकेटरचा स्विच साधारण एकाच संलग्न स्विचला असतो. तर हेडलॅम्पचा स्विच, त्यात अप्पर डिप्पर, सिटी लाइट, पासिंग लाइट असे स्विच एकत्रित एकत्रित असतात. फॉग लॅम्पचा स्विच, वा अन्य अतिरिक्त विद्युत साधने बसवलेली असतील तर त्यांचेही स्विच वाहनांमध्ये असतात. सर्वसाधारणपणे स्विचची होणारी हाताळणी लक्षात घेऊन ते टिकावू पद्धतीने वापरले जावेत व अधिक टिकावेत, अशादृष्टीने त्यांची रचना असते. तरीही स्विच खराब होत असतात. यासाठीच स्विचची हाताळणी ही अतिशय योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे. वैयक्तिक मालकीच्या कारबाबत विचार केला तर प्रामुख्याने ती चालवणारा हा साधारण एकच असतो. फार तर घरातील वा माहितीमधील माणूसही कतार हाताळत असतो. मात्र प्रत्येकाची हाताळणी जरी वेगळी असली तरी स्वतःची कार असल्याने ते स्विच वापरण्यामध्ये फरक असला तरी काही काळजी घेतली जाते. तरीही काही जण स्विचबाबत नीट हाताळणी करीत नाहीत. किंवा त्या स्विचशी खेळ करणारेही कमी नसतात. मुद्दाम करतात असे नाही पण चाळा म्हणूनही सवय लागली जाते. अशा प्रकारच्या सवयीही स्विचचा टिकावूपणा व क्षमता कमी करतात. स्विच वापर करताना तो अतिशय घट्ट हातात धरून जोरात ऑपरेट करणे,अति वजन स्विचच्या क्षमतेपेक्षा त्याच्या हालचाली करताना देणे, अनाहूतपणे वा विनाकारण विरुद्ध बाजूला फिरववा जाणे. काहीवेळा वायपर नीट चालत नसेल वा एखादी विद्युत वायरींगची रचना बिघडली गेली असेल तर त्याचा राग स्विचवर काढला जातो. वास्तविक स्विच अशा प्रकारे वापरून पाहाणेही बरोबर नाही. त्याची पद्धत हलक्या हाताने ऑपरेट करण्याची असते, हे लक्षात घेतले पाहिजे.  एखादे साधन म्हणजे वायपर, हेडलॅम्प, पासिंग लाइट चालत नसेल नीट ऑपरेट होत नसेल तर त्यासाठी स्विच जोराने हाताळून उपयोगाचे नाही, तो हळूवार व त्याच्या पद्धतीने व गतीने चालतो. तुम्ही जोरात ऑपरेट केला म्हणून तो ऑपरेट होत नाही, हे लक्षात घ्यावे. साधारणपणे स्विचचे आयुष्य नीट वापरलात तर भरपूर असते. तो लगेच खराब होत नाही. मात्र त्याची हाताळणी नीट झाली पाहिजे. प्रत्येकाने जर त्याची हाताळणी नीट केली तर त्याचे आयुष्यही वाढेल, योग्यवेळी योग्य रीतीने तो काम करील. मग एकापेक्षा जास्त लोकांनीजरी तो हाताळला तरी तो काम चांगले करील. फक्त त्याची हाताळणी नीट हवी. त्यावरच तुमचा होणारा अनावश्यक खर्च वाचू शकेल.

संबंधित

राज्यात होणार इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती
नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमध्ये चालकानेच पळविली मालकाची कार
महात्मानगरला भरधाव कार झाडावर आदळून चालक ठार
कार चोरीतील आरोपीस घेऊन अकोला पोलीस पुदूच्चेरीला रवाना
सीएनजीचा वापर करताना त्या कारची परिपूर्ण देखभाल करणे अत्यावश्यक

ऑटो कडून आणखी

Auto Expo 2018: चोरांनाही चकवा देणारी स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर FLOW लाँच
Auto Expo 2018: UM Motorcycle ची जबरदस्त UM Renegade Thor बाइक, जाणून घ्या पहिल्या इलेक्ट्रिक क्रूझर बाइकचे फीचर्स
Auto Expo 2018: थर्ड जनरेशनची स्टायलिश लुक असलेली स्विफ्ट लाँच, जाणून घ्या किंमत
Auto Expo 2018: अॅक्टिव्हा 5G सोबत होंडाकडून तरुणांना एक 'सुस्साट' भेट 
भव्य 'कार'नामा... वाहन उद्योगाची सैर घडवणारे Auto Expo 2018

आणखी वाचा