ठळक मुद्देकारच्या बाबतीत अनेकदा असे जाणवते की शहर असो वा महामार्ग अनेक चालक कार वळवताना अतिशय बेदरकारपणे वा अज्ञानीपणे कारचे स्टिअरिंग वापरीत असतात. शहरांमध्ये अनेकदा अशा प्रकारच्या ड्रायव्हिंगमुळे अन्य अेकांचा खोळंबा होत असतो, इतकेच नव्हे तर अशा प्रकारे कार वळवण्याने त्या कारवाल्याचाही वेळ जात असतो, अडचणीच्या जागी कार गेल्यानंतर त्यांना कार मागे घेऊन पुन्हा नीट वळण घ्यावे लागते.

कारच्या बाबतीत अनेकदा असे जाणवते की शहर असो वा महामार्ग अनेक चालक कार वळवताना अतिशय बेदरकारपणे वा अज्ञानीपणे कारचे स्टिअरिंग वापरीत असतात. शहरांमध्ये अनेकदा अशा प्रकारच्या ड्रायव्हिंगमुळे अन्य अेकांचा खोळंबा होत असतो, इतकेच नव्हे तर अशा प्रकारे कार वळवण्याने त्या कारवाल्याचाही वेळ जात असतो, अडचणीच्या जागी कार गेल्यानंतर त्यांना कार मागे घेऊन पुन्हा नीट वळण घ्यावे लागते. यासाठीच कारचा व रस्त्याचा पूर्ण अंदाज घेणे, कारच्या वळवण्यामध्ये आवश्यक असलेला भूमितीचा दृष्टीकोन सुधारणे गरजेचे असते. कारच्या सव बाजूंचा कोनांचा अदाज घेणे, आरशांचा योग्य वापर करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. यू टर्न, राइट टर्न, व लेफ्ट टर्न हे प्रामुख्याने वळणाचे असलेले प्रकार. त्यात इंग्रजी एस आकाराचा रस्ता हा सातत्याने अनेक ठिकाणी दिसतो. इंग्रजी ८ चा आकारामध्ये कार वळवणे हे आरटीओमध्ये सर्वसाधारण सांगितल्या जाणाऱ्या चाचणीचा भाग. तो जर नीट जमला व त्यात तुम्हाला तुमच्या कारचा व कार वळवण्याची मेख समजली तर त्यापेक्षा उत्तम काही नाही. 

शहरात अनेक ठिकाणी उजव्या बाजूला सिग्नलला वळण्यासाठी दोन रांगा दिसतात. यामध्ये डाव्या बाजूची रांग असते. तिने आपली रांग वळतानाही राखायची असते. जर त्या रांगेतील वळण घेणाऱ्या कारने उजव्या बाजूच्या रांगेत प्रवेश केला तर उजव्या रांगेतील अन्य कारना थांबावे लागते. यासाठी उजव्या वळणाच्यावेळी दोन रांगेमध्ये डावीकडील असलेल्या रांगेतील कार चालकाने नेहमी आपल्या डाव्या बाजूला जास्त कल देऊन कार उजवीकडे घ्यावी. वळतानाही त्याने आपली रांग मेंटेन करायला हवी. शहरात अशा चुका अनेकदा दिसत असतात. डावीकडे वळतानाही हा प्रकार असला तर तेथेही त्या पद्धतीने वळण घ्यावे. वळतानाही दोन रांगा लक्षात घेऊन त्या प्रमाणे कारचे वळण घयावे. अन्यथा सिंगर रांग वळणारी असली तर ती मेंटेन करावी. अन्य रांगेत घुसू नये.

महामार्गावर वळण घेताना साधारणपणे अनेक प्रकार वळणाचे दिसतात. सिंगल मार्ग असेल तर तुम्ही तुमची रांग सोडून समोरून येणाऱ्या वाहनांच्या रांगेत घुसू नये, तसे करताना समोरून येणाऱ्या वाहनाशी समोरासमोर टक्कर होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी ओव्हरटेक करणे टाळावे, वळण हा कार ड्रायव्हिंगमधील सर्वात महत्त्वाचा घटक असून वळण घेताना नेहमी सावधपणे वळण घ्यावे. घाटामध्ये वळण घेताना तेथील चढव उतार यांची तीव्रता लक्षात घेऊन, त्यानुसार गीअर बदल करून वळण घ्यावे. उतारावरील वळण घेताना कार वेगात असते, तो वेग नियंत्रित असला पाहिजे. अन्यथा वळणावर वा उतारावार रस्ता सोडून कार रस्त्याच्या बाजूला जाण्याची व काहीवेळा मोठा अपघात होण्याचीही शक्यता असते. जोपर्यंत समोरचे येणारे वाहन दृष्टीपथात येत नसेल तर अशा ठिकाणी वळणावर संयमाने कार चालवावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वळण घेताना आपल्या कारचे साइड इंडिकेटर्सने योग्य संगेक मागून येणाऱ्या व पुढे असणाऱ्यालाही द्यावेत. तुमच्या कारच्या वळण्याला नीट वळण लावणे हे ड्रायव्हिंगमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे.
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.